Petrol-Diesel Price Cut: निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दरात मोठी घट होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

लोकसभा निवडणूकीपुर्वी (Lok Sabha Election) सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price)  कमी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Rate)  सातत्यानं घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे इंधन कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळेच इंधन दरांत कपात होण्याची शक्यता असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या खाली व्यवहार करत आहेत, तसेच तेलाच्या मागणी पेक्षा उत्पादनात देखील मोठी वाढ झाली आहे.   (हेही वाचा - Petrol Diesel Price: 'पेट्रोल-डिजेल दर स्थिर', भारतामध्ये इंधन दरात मोठी घट झाल्याचा केंद्र सरकारचा दावा)

सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

डिसेंबर महिन्यात 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतरच पेट्रोलियम मंत्रालयानं ही घोषणा केली होती. त्यामुळे आता भारतात कच्चं तेल व्हेनेझुएलाहून आयात करण्याची शक्यता आहे.  भारतात 3 वर्षांनंतर व्हेनेझुएला येथून कच्च तेल आयात होण्याची शक्यता वाढली आहे.