Petrol and Diesel Prices in India Today: सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल- डिझेल दरामध्ये वाढ; पहा मुंबई सह मेट्रो सिटी मधील इंधनाचे दर

मागील 3 दिवसांतच पेट्रोल-डीझेलचे दर 60-65 पैशांनी वाढल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

भारतामध्ये विधानसभेचे पडघम जसे संपले तसे आता सामान्यांना पुन्हा महागाईचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. आज (6 मे) सलग तिसर्‍या दिवशी भारतामध्ये इंधनाचे दर चढले आहेत. देशात 2 मे दिवशी 5 विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आणि नंतर 18 दिवसांपासून स्थिर असलेले इंधनाचे दर वाढायला सुरूवात झाली आहे. पेट्रोलचे दर सध्या देशात प्रति लीटर शंभरीच्या जवळ आहे. मुंबई मध्ये आजचा पेट्रोलचा प्रति लीटर दर Rs 97.34 आहे. तर डिझेल प्रति लीटर दर Rs 88.49 इतका आहे.

मुंबई प्रमाणेच दिल्लीमधील दर Rs 90.99 प्रति लीटर पेट्रोलसाठी आणि Rs 81.42 प्रति लीटर दर डीझेलसाठी आहे. चैन्नई मध्ये पेट्रोल प्रति लीटर Rs 92.90 आणि डिझेल Rs 86.35 आहे. तर कोलकाता मध्ये पेट्रोल प्रति लीटर Rs 91.14 आणि डिझेल प्रति लीटर Rs 84.26 आहे. महाराष्ट्रातील आजच्या पेट्रोल,  डिझेलच्या किंमती इथे पहा.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्य किंमतीमध्ये वाढ कायम आहे. मागील मंगळवारी, कच्च्या तेलाच्या किंमतीने सात आठवड्यांमधील उच्चांक गाठला होता. पण भारतामध्ये विधानसभा निवडनूक आणि त्याचे निकाल याची धामधूम असल्याने कच्चा तेलाची किंमत वाढूनही त्याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर दिसला नव्हता. मात्र मागील 3 दिवसांतच पेट्रोल-डीझेलचे दर 60-65 पैशांनी वाढल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

देशात पेट्रोल-डीझेल ची नवी किंमत रोज सकाळी 6 वाजता अपडेट केली जाते. फ्युएल रिटेलर्स इनपूट कॉस्ट जारी करतात मग त्यावर प्रत्येक राज्यानुसार, एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन, अन्य टॅक्स यांची भर पडते आणि पुढील किंमती ठरवल्या जातात.