Petrol,Diesel Price in India: पेट्रोल दर स्थिर, आज पुन्हा महागले डिझेल; पाहा तुमच्या शहरातील इंधनाच्या किमती
त्यामुळे पेट्रोल, डिझेल दरात प्रतिदिन बदल होत असतात. ऑयल मार्केटिंग कंपन्या दरोज पेट्रोल, डिझेल दर निश्चित करतात. इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या प्रमुख तेल कंपन्या देशातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेल दर प्रतिदिन अद्ययावत करत असतात.
पेट्रोल दर (Petrol Price) आज जवळपास सलग 21 दिवस झाले स्थिर आहेत. डीझेल दर (Diesel Price) मात्र देशभरात 25 ते 27 पैशांनी वाढले आहेत. देशातील सर्वात मोठी इंधन विक्रेता कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार देशाच्या राष्ट्रीय राजधानीत पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 25 पैशांनी वाढून 89.07 रुपये प्रतिल लीटर दराने विकले जात आहे. तेल कंपन्यांनी 01 सप्टेंबर आणि 05 सप्टेंबरला म्हणजेच आतापर्यंत 2 वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) दरात 15-15 पैसे रुपये प्रति लीटर इतकी कपात केली होती.
सप्टेंबरमध्ये पेट्रोल-डिझेल दरात 30 पैसे दरांनी कपात झाली होती. त्यानंतर इंधन दर स्थिर राहिले. 24 सप्टेंबरला डिझेल दराच्या किमती देशभरात 20 ते 22 पैसे इतकी वाढ झाली. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा पेट्रोल डिझेल दर 25 ते 27 पैशांनी वाढले. (हेही वाचा, Today Gold-Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर)
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेल दर (प्रति लीटर)
शहर पेट्रोल डीजल
दिल्ली 101.19 89.07
मुंबई 107.26 96.68
भोपाल 109.63 97.92
जम्मू 100.53 89.71
चेन्नई 103.79 95.10
रांची 96.21 94.05
(* सर्व आकडेवारी IOCL ने दिलेल्या माहितीनुसार)
आंतरराष्ट्रीय चलन दरासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती नियमीत बदलत असतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेल दरात प्रतिदिन बदल होत असतात. ऑयल मार्केटिंग कंपन्या दरोज पेट्रोल, डिझेल दर निश्चित करतात. इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या प्रमुख तेल कंपन्या देशातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेल दर प्रतिदिन अद्ययावत करत असतात.
पेट्रोल-डीजल (Petrol-Diesel) के दाम प्रतिदिन अपडेट किए जाते हैं. ऐसे में आप सिर्फ एक SMS के जरिए रोज अपने शहर में पेट्रोल-डीजल की कीमत जान सकते हैं. इसके लिए इंडियन ऑयल (IOCL) के ग्राहकों को RSP कोड लिखकर 9224992249 नंबर पर भेजना होगा.