Coronil औषधावरून सुरु झालेल्या वादात पतंजलि कडून स्पष्टीकरण; औषधनिर्मिती किंवा परवाना मिळवताना काहीही गैर केले नसल्याचा दावा
पतंजलि तर्फे लाँच करण्यात आलेल्या कोरोनिल औषधाचा परवाना मिळवताना गैर मार्ग वापरलेला नाही. चुकीची जाहिरात सुद्धा केलेली नाही आम्ही औषधाचे परिणाम सांगितले आहेत अशी माहिती पतंजलीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आचार्य बालाकृष्ण (Acharya Balakrishna) यांनी दिली आहे
Coronil औषधावरून सुरु झालेल्या वादात आज अखेरीस पतंजलि (Patanjali) कडून स्पष्टीकरण देण्यात आले. पतंजलि तर्फे लाँच करण्यात आलेल्या कोरोनिल औषधाचा परवाना मिळवताना गैर मार्ग वापरलेला नाही. चुकीची जाहिरात सुद्धा केलेली नाही आम्ही औषधाचे परिणाम सांगितले आहेत अशी माहिती पतंजलीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आचार्य बालाकृष्ण (Acharya Balakrishna) यांनी दिली आहे. आम्ही औषध (कोरोनिल) तयार करण्यासाठी सर्व प्रक्रियेचे अनुसरण केले आहे. आम्ही औषधात वापरल्या जाणार्या घटकांच्या शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे परवान्यासाठी अर्ज केला. आम्ही कंपाऊंडवर काम केले आणि क्लिनिकल चाचणीचा निकाल लोकांसमोर ठेवला यात काहीही चूक नाही असे सुद्धा बालाकृष्ण यांनी म्हंटले आहे.Coronil: कोव्हिड 19 वर पतंजलि कडून आयुर्वेदिक औषध, 3 दिवसांत 69% रूग्ण बरे होत असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा.
प्राप्त माहितीनुसार, उत्तराखंड आयुर्वेद डिपार्टमेंटने बाबा रामदेव यांच्या पतंजलि कंपनीने सादर केलेल्या रिपोर्ट्स मध्ये खोकला, ताप आणि इम्युनिटी बुस्टर साठी परवानगी मागितली होती त्यामध्ये कोरोना वायरसचा उल्लेख नाही असे म्हंटले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पतंजलि विरुद्ध नोटिस जारी केली होती. पतंजली ने दिलेल्या रिपोर्टनुसार आम्ही परवाना दिला आहे त्यामध्ये कोरोना वायरस, कोव्हिड 19 चा उल्लेख नव्हता असे आयुर्वेद डिपार्टमेंट ने अत्यंत स्पष्टपणे म्हंटले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, आयुष मंत्रालयाच्या श्रीपाद नाईक यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना,"बाबा रामदेव यांनी देशाला नवी औषधं दिली ही चांगली गोष्ट आहे परंतू नव्या औषधांच्या मान्यातांना कही नियम आहे. आयुष मंत्रालयाला त्याची माहिती देणं आवश्यक आहे. पतंजली कडून रिपोर्ट देण्यात आला आहे , आम्ही त्याची पडताळणी करू. त्यानंतरच औषधाला परवानगी द्यायची की नाही? हे ठरेल." असे स्पष्ट केले आहे.