Passengers Attack Mahakumbh Special Train: महाकुंभ विशेष ट्रेनवर प्रवाशांकडून हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Railway Violence: महाकुंभ 2025साठी झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या एका विशेष ट्रेनवर प्रवाशांनी हल्ला केला. हरपालपूर स्टेशनवर ही घटना घडली. ज्यामध्ये ट्रेनच्या खिडक्या फुटल्या आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली

Train Stone Pelting | (Photo Credit- X)

Train Stone Pelting: महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) साठी झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या एका विशेष ट्रेनवर (Prayagraj Special Train) एका प्रवाशाने हल्ला केला आहे. ही ट्रेन हरपालपूर रेल्वे स्थानकावर (Harpalpur Station) प्लॅटफॉर्मवर आली. मात्र, ट्रेनचे दरवाजे आतून बंद होते. ज्यामुळे फलाटावरील प्रवासी प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी ट्रेनवर दगडफेक केली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये एक प्रवासी खिडकीतून ट्रेनमध्ये दगड फेकताना पाहायला मिळत आहे. या प्रकारानंतर ट्रेनमध्ये आत असलेले प्रवासी प्रचंड भेदरुन गेले. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दगडफेक पाहून ट्रेनमधील प्रवाशांचा आरडाओरडा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेचे व्हिडिओ दाखवतात की दगडफेक झाल्याने ट्रेनमधील प्रवासी घाबरून ओरडत होते आणि अनेक खिडक्या फुटल्या. एका प्रवाशाने सांगितले की, ट्रेन रात्री 8 वाजता झाशीहून निघाली आणि हल्ला झाला तेव्हा हरपालपूरला पोहोचली. आमच्यावर दगडफेक करण्यात आली. महिला आणि मुले घाबरली आहेत.

नेमके काय घडले?

प्रयागराजमधील आध्यात्मिक उत्सवासाठी निघालेल्या महाकुंभ विशेष ट्रेनमध्ये झाशीपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर असलेल्या हरपालपूर स्टेशनवर चढण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. वृत्तानुसार, ट्रेन फलाटावर पोहोचली तेव्हा डब्याचे दरवाजे बंद होते. त्यामुळे स्टेशनवर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना राग आला. या रागाचे रुपांतर हिंसाचारात झाले आणि त्यांनी ट्रेनवर दगडफेक केली, ज्यामुळे ट्रेनच्या खिडक्या फुटल्या आणि आत असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला, असे या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या विविध प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

रेल्वे पोलिसांकडून घटनेची पुष्टी

हरपालपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पुष्पक शर्मा यांनी पहाटे 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची पुष्टी केली. प्रवक्ते मनोज सिंग रेल्वेने स्पष्ट केले की, ट्रेनची वाट पाहणाऱ्या जमावाने चढण्याचा प्रयत्न केला पण दरवाजे बंद असल्याचे आढळले. ते संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घातला. रेल्वे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून सुव्यवस्था पूर्ववत केली आणि ट्रेनचा प्रवास कायम ठेवला.

रल्वेवर दगडफेक करताना प्रवासी

रेल्वेकडून प्रवाशांना सहकार्याचे आवाहन

रेल्वेने प्रवाशांना शांत राहण्याचे आणि अशा प्रकारचे व्यत्यय टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. महाकुंभासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीला तोंड देण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. आम्ही प्रवाशांना प्रोटोकॉलचे पालन करण्याची आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्याची विनंती करतो, असे सिंह पुढे म्हणाले. दरम्यान, महाकुंभासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने गर्दीचे व्यवस्थापन करण्यात. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी उपाययोजनांचा आढावा घेत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now