IPL Auction 2025 Live

Cross-Border Love Story: प्रियकरासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानी तरुणी भारतात दाखल, पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जानेवारीमध्ये उडवणार लग्नाचा बार

तसेच जगभर पसरलेल्या कोविड संसर्गामुळे तिला भारतात येण्यासाठी तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली.

Image Credit - Ani Twitter

कोलकाता येथील आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न करण्यासाठी एक पाकिस्तानी तरुणी  भारतात दाखल झाली आहे. जवेरिया खानुम असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे. भारत सरकारने तिला 45 दिवसांचा व्हिसा मंजूर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यापुर्वी दोन वेळा तिझा व्हिसा रद्द झाला होता. व्हिसा मंजूर होताच या तरुणीने  वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. यावेळी तिचा होणारा नवरा समीर खान आणि भावी सासरे अहमद कमाल खान युसुफजाई यांनी ढोल वाजवून तिचे दिमाखात स्वागत केले.    (हेही वाचा -  Seema Haider- Sachin Romantic During Live Show: लाईव्ह टिव्ही शोच्या दरम्यान रोमँटीक झाले सचिन आणि सीमा, Video Viral)

पाहा पोस्ट -

जवेरिया खानुमला भारत सरकारने दोन वेळा व्हिसा नाकारला आहे. तसेच जगभर पसरलेल्या कोविड संसर्गामुळे तिला भारतात येण्यासाठी तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली. जवेरिया भारतात आल्यानंतर या जोडप्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  समीर आणि जवेरिया पुढील वर्षी जानेवारीमध्ये लग्न करणार आहेत. त्यानंतर जेवेरिया दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज करणार आहे.