IPL Auction 2025 Live

Pakistan Flood: पंतप्रधान मोदींचं ट्वीट बघताचं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांना मानावे लागले आभार

तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

पाकिस्तानमध्ये मुसळधार (Pakistan Rain) पाऊस सुरु आहे. यामुळे देशातील विविध भागात पाणी साचलं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. महापूरामुळे (Pakistan Flood) आतापर्यंत लहान मुलांसह 1000 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी पाकिस्तानातील (Pakistan) पूरस्थिती या शतकातील आलेला महापूर म्हणून घोषित करण्यास हरकत नाही. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारकडून (Pakistan Government) आता राष्ट्रीय आणीबाणी (Emergency) लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तरी पाकिस्तानातील या भीषण परिस्थितीवर ट्वीट (Tweet) करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी खेद व्यक्त केला आहे.

 

पंतप्रधान मोदींनी ट्वीट (PM Modi Tweet) केलं आहे, ‘पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे झालेला विध्वंस पाहून वाईट वाटले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना, जखमींना आणि या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होण्याची आशा करतो.’पंतप्रधान मोदींचं हे ट्वीट (Tweet) बघता भारत पाकिस्तान संबंधांबाबत चर्चांना मोठं उधाण आलं आहे. आंतराष्ट्रीय (International) स्तरावर पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटची चर्चा होत आहे. (हे ही वाचा:- PM Modi: जाणून घ्या पंतप्रधान मोदींची लाईफस्टाईल, RTI मधून आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे)

 

एवढचं नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ (Shahbaz Sharif) यांनी देखील मोदींच्या या ट्वीटला (Tweet) उत्तर देत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. पूरग्रस्त पाकिस्तानमधील (Pakistan) परिस्थिवर शोक व्यक्त केल्याबाबत शाहबाज शरिफ यांनी पंतप्रधान मोदी (PM Modia) यांचे आभार मानले असुन पाकिस्तान लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर येवो आणि पाकिस्तानातील जनतेला बळ मिळो अशा आशयाचं ट्वीट करत शहबाज शरिफ यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवर प्रतिक्रीया दिली आहे.