Padma Awards 2022: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; बिपिन रावत यांना पद्मविभूषण, सुंदर पिचाई यांना पद्मभूषण, तर नीरज चोप्राला पद्मश्री जाहीर (See Full List)

यंदा पद्मविभूषणसाठी एकूण चार नावांची निवड करण्यात आली आहे, तर पद्मभूषणसाठी 17 नावांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय पद्मश्री पुरस्कारासाठी 107 जणांची निवड करण्यात आली आहे

CDS General Bipin Rawat (Photo: PTI)

केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पद्मविभूषणसाठी एकूण चार नावांची निवड करण्यात आली आहे, तर पद्मभूषणसाठी 17 नावांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय पद्मश्री पुरस्कारासाठी 107 जणांची निवड करण्यात आली आहे. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्यांपैकी तिघांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला आहे. माजी सीडीएस जनरल बिपिन रावत (नागरी सेवा), माजी भाजप नेते कल्याण सिंग (सार्वजनिक व्यवहार) आणि गीताप्रेस गोरखपूरचे अध्यक्ष राधेश्याम खेमका (साहित्य आणि शिक्षण) यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. याशिवाय भारतीय शास्त्रीय संगीतकार डॉ प्रभा अत्रे यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.

याशिवाय पद्मभूषणसाठी जाहीर करण्यात आलेल्या 17 नावांमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी संबंधित सायरस पूनावाला, देशात स्वदेशी कोरोना लस विकसित करणारी हैदराबादस्थित कंपनी भारत बायोटेकचे मालक, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, व्हिक्टर बॅनर्जी, गुरमीत बावा, महाराष्ट्रातील नटराजन चंद्रशेखरन, तेलंगणातील कृष्णा इला आणि सुचित्रा इला यांचा समावेश आहे.

यासह, ऑलिंपियन नीरज चोप्रा, प्रमोद भगत आणि वंदना कटारिया, गायक सोनू निगम अशा 107 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, कला, सामाजिक कार्य, जनसेवा, साहित्य, व्यवसाय, वैद्यक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री सन्मान दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. हे पुरस्कार भारत सरकारकडून दरवर्षी भारतीय नागरिकांना त्यांच्या अपवादात्मक कार्यासाठी दिले जातात. 1954 साली पद्म पुरस्कारांची सुरुवात झाली. त्यानंतर 1978 ते 1979 आणि 1993 ते 1997 या कालावधीतील अल्प व्यत्यय वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याची घोषणा केली जाते.

पद्म पुरस्कारांची शिफारस राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, केंद्रीय मंत्रालये किंवा विभाग तसेच उत्कृष्ट संस्थांद्वारे केली जाते. तुम्ही स्वतःही या पुरस्कारासाठी अर्ज करू शकता. यानंतर एक समिती या नावांवर विचार करते. पुरस्कार समितीने शिफारस केल्यानंतर, पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपती त्यांची मान्यता देतात आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif