OYO Layoff: आयटी कंपन्यांपाठोपाठ आता OYO कर्मचाऱ्यांनाही नारळ, कार्यप्रणालीतील बदलाचं कारण देत शेकडो कर्मचाऱ्यांची कपात

दरम्यान जवळपास ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय ओयो कडून घेण्यात आला आहे.

OYO

देशात बेरोजगारीचं (Unemployment) प्रमाण वाढलं आहे त्यात रोजचं नोकरकपातीच्या बातम्या कानावर पडतात. अॅमेझॉन (Amazon), ट्विटर (Twitter), गुगल (Google), एचपी (HP) सारख्या बड्या कंपन्यांनी नोकर कपातीचा (Layoffs) धडाका लावला आहे. तर आता दुसऱ्या बाजूला ओयो (OYO) किंवा शेअर चॅट (Share Chat) सारख्या भारतीय कंपन्यांमधील नोकरवर्ग बेरोजगारीच्या मार्गावर आहे. ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल (CEO Ritesh Agrawal)  यांनी याबाबत माहिती दिली आहे. ओयो उत्पादन (Production), इंजिनिअरींग (Engineering), कॉर्पोरेट मुख्यालय (Corporate Office) आणि वॅकेशन होम टीम या खात्यातील नोकरदारांची नोकर कपात करणार आहे. दरम्यान जवळपास ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय ओयो कडून घेण्यात आला आहे. तरी ओयो रिलेशनशीप मॅनेजमेंट (Relation Ship Management) आणि बिजनेस डेव्हलपमेंट क्षेत्रातील उमेदवारांची लवकरचं भरती करणार आहे. आयोच्या कार्यप्रणालीत मोठे बदल झाल्यामुळे ओयोने हा निर्णय घेतल्याची माहिती ओयो ऑफिशिअल्स (OYO Officials) कडून देण्यात आला आहे.

 

ओयोतील नोकर कपातीबाबत बोलतांना ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल म्हणाले, आमच्याकडून ज्या नोकरदारांना काढून टाकण्यात येईल अशा उमेदवारांना इतर ठिकाणी चांगली नोकरी मिळावी ह्याची आम्ही नक्कीचं काळजी घेवू. किंबहुना या नोकरदारांना दुसरी नोकरी शोधण्यास ओयो खुद्द प्रयत्नशील आहे. या होतकरु कर्मचाऱ्यांमुळेचं ओयोची एवढी प्रगती झाली तरी भविष्यात जेव्हा केव्हा ओयोत नोकरभरती होई तेव्हा या उमेदवारांनाचं सर्वप्रथम प्राधान्य दिल्या जाईल असं रितेश अग्रवाल म्हणाले. (हे ही वाचा:- ShareChat Layoff: आता शेअर चॅट मध्येही कर्मचाऱ्यांची कपात, मोठ्या कालावधीपासून शेअर चॅट बरोबर कामावर असलेले कर्मचारी बेरोजगार)

 

तरी ओयोच्या या तडकाफकी निर्णयाचा ओयोतील नोकरदार वर्गावर गंभीर परिणाम होणार आहे. विविध विदेशी कंपनीत नोकर कपातीचं संकट असताना स्वदेशी भारतीय कंपनीच्या नोकर कपातीच्या निर्णयानंतर अनेक कुटुंबांच्या उदर्निवाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारी नोकरी मिळण अवघड तर खासगी नोकऱ्यांमध्येही नोकर कपातीची टांगती तलवार असल्यास तरुणांनी आता काय करावं असा प्रश्न देशाच्या युवा पिढीपुढे आहे.