Statue Of Unity पाहण्यासाठी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी, शनिवारी २७,००० लोकांनी पहिला पुतळा

केवाडिया येथील सरदार सरोवराच्या काठावर सुमारे १८२ मीटर उंचीचा हा पुतळा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Statue-O fUnityPhoto credits: ANI)

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue Of Unity) या पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पार पडले. १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी हा पुतळा खुला करण्यात आला असून शनिवारी सुमारे २७,००० लोकांनी हा पुतळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. केवाडिया येथील सरदार सरोवराच्या काठावर सुमारे १८२ मीटर उंचीचा हा पुतळा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

दर सोमवारी हा पुतळा मेंटेननन्सच्या कामासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक मंगळवार ते रविवार या दिवसातच पुतळा पाहू शकतात. सरदार वल्लभ भाइ पटेलांच्या भव्य पुतळ्या ला पाहण्यासाठी लिफ्टची सोय करण्यात आली आहे. दोन लिफ़्टच्या मदतीने सुमारे ५ हजार पर्यटक एका दिवसात ये-जा करू शकतात. तसेच पुतळ्याजवळील गॅलरीमध्येही आजूबाजूचा भाग न्याहळण्याची सोय करण्यात आली आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देण्यासाठी कसे पोहचाल आणि काय आहेत तिकीट दर ?

फुलांचा बगिचा, संग्रहालय, स्मारक आणि सरदार सरोवर डॅम, टेन्ट हाऊस म्हणजे तंबू मध्ये पर्यटकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच खास सेल्फी पॉईंट देखील राखीव ठेवण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif