Opposition Leaders Protest March: अदानी मुद्द्यावरून विरोधकांचा संसद ते ED कार्यालय निषेध मोर्चा
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला होता की अदानी समूह "स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे" आणि स्टॉकच्या किमती वाढवण्यासाठी ऑफशोअर शेल कंपन्यांचा वापर केला होता.
अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांनी (Opposition MPs) सक्तवसुली संचालनालयच्या (ED) कार्यालयाकडे काढलेला मोर्चा आज संसदेपासून सुरू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रोखला. अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी हे नेते करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली आहे आणि नेत्यांना सांगितले आहे की त्यांनी आंदोलन मागे न घेतल्यास कलम 144 लागू असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात येईल.विरोधी पक्षनेत्यांनी ईडी कार्यालयात जाऊन तक्रार देण्याचे आणि अदानी-हिंडेनबर्ग (Adani Hindenburg Case) प्रकरणाच्या चौकशीसाठी दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा व्हिडिओ -
भाजपने याला ‘भ्रष्टाचाऱ्यांचा मोर्चा’ म्हटले आहे.
आदल्या दिवशी, नेत्यांनी या विषयावर त्यांची संयुक्त रणनीती आखण्यासाठी संसद भवन संकुलातील राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती.
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला होता की अदानी समूह "स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे" आणि स्टॉकच्या किमती वाढवण्यासाठी ऑफशोअर शेल कंपन्यांचा वापर केला होता. अदानी समूहाने आरोप नाकारले आणि त्यांना दुर्भावनापूर्ण आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.