Online Sale: 36 तासांत Amazon वर तब्बल 750 कोटी रुपयांच्या मोबाईलची विक्री; फ्लिपकार्टच्या नफ्यात दुप्पटीने वाढ
तर प्रतिस्पर्धी फ्लिपकार्टने, 'बिग बिलियन सेल' पहिल्या दिवशी दुपटीने नफा मिळाल्याचे सांगितले आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत हे दोन्ही सेल चालू असणार आहेत. स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशीच्या विक्रीनंतर दोन्ही कंपन्या नफ्याच्या बाबतीत अतिशय सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे
![Online Sale: 36 तासांत Amazon वर तब्बल 750 कोटी रुपयांच्या मोबाईलची विक्री; फ्लिपकार्टच्या नफ्यात दुप्पटीने वाढ](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-27T133503.655-784x441-1.jpg)
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांनी आर्थिक मंदी आणि वस्तूंच्या मागणीत घट असूनही आपल्या फेस्टिवल सेलच्या (Festive Sale) विक्रीत तुफान कमाई केली. शनिवारीपासून सुरू झालेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अॅमेझॉनने फक्त 36 तासांमध्ये तब्बल 750 कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची (Smartphones) विक्री केल्याचा दावा केला आहे, तर प्रतिस्पर्धी फ्लिपकार्टने, 'बिग बिलियन सेल' पहिल्या दिवशी दुपटीने नफा मिळाल्याचे सांगितले आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत हे दोन्ही सेल चालू असणार आहेत. स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशीच्या विक्रीनंतर दोन्ही कंपन्या नफ्याच्या बाबतीत अतिशय सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
एका अहवालानुसार या फेस्टीव्ह सेलमध्ये ई-कॉमर्स कंपन्या पाच अब्ज डॉलर्सपर्यंत विक्री करू शकतात. अॅमेझॉन ग्लोबलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारताचे प्रमुख अमित अग्रवाल म्हणाले की, परवडणार्या योजनेमुळे ग्राहकांनी वन प्लस, सॅमसंग आणि Apple सारख्या प्रीमियम ब्रँडचे मोबाइल फोन विकत घेतले. त्याचप्रमाणे पहिल्या 36 तासांत मोठ्या वस्तू आणि टीव्हीची विक्री दहापट वाढली. याशिवाय फॅशनमध्ये इतर दिवसांच्या तुलनेत पाच पट, सौंदर्य उत्पादनांमध्ये सातपट, दररोज वापराच्या वस्तूंमध्ये 3.5 पट वाढ झाली आहे. या सेलमध्ये वस्तू खरेदी करणारे अर्धे ग्राहक हे टियर 2 आणि छोट्या शहरांमधील आहेत. (हेही वाचा: Flipkart आणि Amazon वर 29 सप्टेंबर ला सुरु होणा-या सुपर सेलमध्ये मिळणार तुमच्या आवडत्या मोबाईल्सवर मिळतायत या जबरदस्त ऑफर्स, वाचा सविस्तर)
दुसरीकडे व्यापार संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी)चे म्हनाहे आहे की, उत्सवाच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या मूळ किंमतीऐवजी सवलतीच्या दरावर जीएसटी लावून वस्तूंची विक्री करतात. यामुळे सरकारच्या महसुलावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबतीत संघटनेने रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्रही लिहिले आहे. दरम्यान, या आतल्या गोष्टी काहीही असो, ग्राहकांना त्य्तांना हव्या असलेल्या वस्तू सवलतीच्या दारात उपलब्ध होत आहेत हे महत्वाचे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)