ONGC Recruitment: पब्लिक रिलेशन ऑफिसर आणि एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक
कारण भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालायच्या अधीन आणि देशातील सर्वाधिक मोठी कंपनी ओएनजीसी लिमिडेट मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर आणि एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे.
ONGC Recruitment: पब्लिक रिलेशन किंवा एचआर मध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कारण भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालायच्या अधीन आणि देशातील सर्वाधिक मोठी कंपनी ओएनजीसी लिमिडेट मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर आणि एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार, एचआर एक्झिक्युटिव्हच्या 15 आणि पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या 6 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, ओएनजीसीमध्ये पीआरओ आणि एचआरच्या पदाची भरती ही युजीसी नेट जून 2020 च्या गुणांच्या आधारवर केली जाणार आहे.
या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संबंधित विषयात युजीसी द्वारे आयोजित NEET जून 2020 रोजी उत्तीर्ण झालेले असावे. त्याचसोबत एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून एचआर संबंधित विषयात एमबीए कमीत कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे. त्याचसोबत पीआरओ पदासाठी उमेदवाराने जर्नलिज्म आणि मास कम्युनिकेशन मध्ये पीजी डिग्रीत कमीत कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कंपनीची अधिकृत वेबसाइट ongcindia.com येथे भेट द्यावी. येथे देण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची अखेरची तारीख 4 जानेवारी 2022 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 300 रुपयांचा शुल्क भरावा लागणार आहे. परंतु हे शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत.