Jammu Kashmir Road Accident: जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीत कार पडल्याने एक ठार, 2 बेपत्ता; बचाव कार्य सुरू (Watch Video)

ही घटना घडली तेव्हा कारमध्ये दोन वृद्ध आणि एक 25 वर्षीय व्यक्ती होती.

Jammu Kashmir Road Accident (फोटो सौजन्य - ANI)

Jammu Kashmir Road Accident: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) च्या डोडा जिल्ह्यात (Doda District) शनिवारी एक खाजगी कार चिनाब नदीत (Chenab River) पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच अद्याप दोन प्रवासी बेपत्ता आहेत. जम्मू काश्मीरचे ट्रॅफिक डीवायएसपी मुखतियार देव सिंह यांनी सांगितले की, प्रेम नगर आणि थाथरी दरम्यान कंडोटे येथे सकाळी 8.30 वाजता हा अपघात झाला. ही घटना घडली तेव्हा कारमध्ये दोन वृद्ध आणि एक 25 वर्षीय व्यक्ती होती.

मुखतियार देव सिंह यांनी सांगितले की, 'ते दोडा येथे जात होते. आर्मी रिकव्हरी व्हॅन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस प्रशासन सर्व त्यांचे काम करत आहेत. तपास सुरू आहे. हा अपघात चुकीच्या दिशेने कसा झाला याचा तपास सुरू आहे. आम्ही 70 वर्षीय महिला पूरवी देवी यांचा मृतदेह बाहेर काढला आहे.' (हेही वाचा -Gondia Shivshahi Bus Accident: गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत जाहीर; PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख)

जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीत कार पडल्याने एक ठार, बचाव कार्य सुरू; पहा व्हिडिओ -

हा अपघात सकाळी 8.30 च्या सुमारास खांडोटे गावाजवळ घडला आणि बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि स्थानिक स्वयंसेवक यांचे संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. रणजीत कुमार (25) आणि त्यांचे नातेवाईक बेली राम (60) आणि पूरवी देवी (60) हे तीन जण चर्या गावातून जम्मूला जात असताना कार नदीत कोसळली. पूरवी देवी यांचा मृतदेह नदीच्या काठावर पडलेला आढळला. तसेच कारमधील इतर दोन प्रवासी नदीत बुडाले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे, असंही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.