COVID-19 3rd Wave in India: भारताला कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचा धोका! कोविड पॅनलने दिला इशारा; कशी होईल नववर्षाची सुरुवात?

ही लाट ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे येऊ शकते. तिसऱ्या लाटेचा फेब्रुवारी 2022 हा सर्वोच्च बिंदू असेल.

coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. आता स्थिती सर्वसामान्य होण्याकडे वाटचाल करत असली तरी, कोरोनाची तिसऱ्या संभाव्य लाटेची (COVID-19 3rd Wave in India) जोरादर चर्चा सुरु झाली आहे. नॅशनल कोविड सुपरमॉडेल कमेटीने (Covid-19 Super Model Committee) इशारा दिला आहे की, 2022 च्या नववर्षात कोरोना व्हायरस महामारीची तिसरी लाट येऊ शकते. ही लाट ओमायक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे येऊ शकते. तिसऱ्या लाटेचा फेब्रुवारी 2022 हा सर्वोच्च बिंदू असेल. नॅशनल कोविड सुपरमॉडेल कमेटीचे प्रमुख प्रोफेसर विद्यासागर यांनी म्हटले की, देशात ओमिक्रॉन स्ट्रेन कोरोनाची तिसरी लाट घेऊन येईल. मात्र, देशात रोगप्रतिकारशक्तीची वाढ झाल्याने ही लाट दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सौम्य असेल.

प्रोफेसर विद्यासागर यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत प्रतिदिन येणाऱ्या रुग्णसंख्येचा आकडा कमी असल्याची शक्यताही वर्तवली. नॅशनल कोविड सुपरमॉडेल कमेटीने म्हटले आहेकी, देशात हळूहळू संसर्ग वाढेल. जो तिसऱ्या लाटेत परावर्तीतहोईल. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी असेल. देशातील वाढत्या लोकप्रतिकारक शक्तीमुळे तिसरी लाट हलकी असू शकते. (हेही वाचा, BMC COVID-19 Guidelines On New Year Celebration: ख्रिसमस, नववर्ष सेलिब्रेशन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून निर्बंध; घ्या जाणून)

देशभरात पाठीमागील 24 तासात 7,081 जण कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. तर 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या आधीच्या 24 तासामध्ये देशभरातील 7,469 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, देशभरात आजघडीला सुमारे 84,000 कोरोना संक्रमित सक्रीय रुग्ण आहेत. हा आकडा पाठिमागील 19 महिन्यांमधील सर्वात कमी आकडा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif