देशात कोरोनाच्या अॅक्टीव्ह केसेसपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या तब्बल 1.65 लाखांनी अधिक; रिकव्हरी रेट 60.77%- आरोग्य मंत्रालय

देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत असून सध्या 60.77% इतका आहे. तर देशातील 21 राज्यांचा रिकव्हरी रेट अॅव्हरेजपेक्षा अधिक आहे.

Coronavirus Cases in India (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आशादायी चित्र निर्माण करत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, देशात अॅक्टीव्ह केसेसपेक्षा (Active Cases) रिकव्हर झालेल्यांची संख्या 1.65 लाखाने अधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि सध्या कोरोना बाधित असणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 1,64,268 इतका फरक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) सातत्याने सुधारत असून सध्या 60.77% इतका झाला आहे. तर देशातील 21 राज्यांचा रिकव्हरी रेट अॅव्हरेजपेक्षा अधिक आहे. (भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 6,73,165 वर; मागील 24 तासांत 24,850 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर तर 613 मृतांची नोंद)

भारतात एकूण 673165 रुग्ण असून त्यापैकी 409083 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात 244814 अॅक्टीव्ह केसेस आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर मागील 24 तासांत तब्बल 14,856 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. राज्य आणि केंद्राच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे, हे यावरुन स्पष्ट होते. (भारतात आतापर्यंत कोविड-19 च्या एकूण 97,89,066 सॅपल टेस्ट- ICMR ची माहिती)

PIB India Tweet:

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 200064 इतकी असून त्यापैकी 108082 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 83295 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण 8671 रुग्ण कोविड-19 च्या संसर्गामुळे दगावले आहेत. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा मोठा असल्याने कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.