IPL Auction 2025 Live

NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या विरोधात CBI कडून लूकआउट नोटीस जाहीर

पीटीआयने याबद्दल माहिती दिली आहे. एक दिवस आधीच आयकर विभागाने टॅक्स चोरी अंतर्गत रामकृष्ण यांच्या परिसरात छापेमारी केली होती.

Chitra Ramkrishna | (File Image)

सीबीआयने शुक्रवारी नॅशनल स्टॉक एक्सजेंच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या विरोधात लूकआउट नोटीस जाहीर केली आहे. पीटीआयने याबद्दल माहिती दिली आहे. एक दिवस आधीच आयकर विभागाने टॅक्स चोरी अंतर्गत रामकृष्ण यांच्या परिसरात छापेमारी केली होती. अन्य एक माजी सीईओ रवि नारायण आणि माजी सीओओ आनंद सुब्रमण्यम यांच्या विरोधात ही लूकआउट नोटीस जाहीर केली आहे.(BMC Issues Notice to Narayan Rane: नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस; जुहू येथील बंगल्याची अधिकारी करणार पाहणी)

या प्रकरणी माहिती देणाऱ्या एका अधिकाऱ्याने मिंटला सांगितले की, सीबीआय आज मुंबईत रामकृष्ण यांची चौकशी करत असून आनंद सुब्रमण्यम आणि रवि नारायण यांच्या विरोधात लूकआउट नोटीस दिली आहे. ही कारवाई सेबीच्या आदेशानुसार समोर आलेल्या सत्याच्या आधारावर 2018 मध्ये दाखल झालेल्या एफआयआर अंतर्गत झाली आहे. चित्रा रामकृष्ण एनएसई यांचे समूह ऑपरेटिंग अधिकारी आणि प्रबंध निर्देशक यांच्या सल्लागाराच्या रुपात आनंद सुब्रमण्यम यांच्या नियुक्ती संदर्भातील अनियमिततांच्या आरोपांचा सामना करत आहेत.

सदर प्रकरण हे चित्रा रामकृष्ण 2013 आणि 2016 दरम्यान नॅशनल स्टॉक एक्सजेंचच्या प्रबंध निर्देशक आणि सीईओ होत्या. सीबीआयचा तपास आणखी एका घोटाळ्यासंबंधित आहे. जो रामकृष्ण यांच्या कार्यकाळादरम्यान समोर आला होता. असा आरोप लावण्यात आला होता की, काही व्यापार्‍यांना NSE च्या सह-स्थान सुविधेसाठी प्राधान्य प्रवेश मिळाला. हे लोक लवकरच लॉग इन करु शकत होते. या व्यतिरिक्त एक्सजेंच मध्ये डेटा फीडसाठी स्प्लिट-सेकंद एक्सेस सुद्धा मिळवत होते. असा ही आरोप लावण्यात आला होता की, एक्सजेंच डेटा पर्यंत पोहचण्यालाठी काही व्यापाऱ्यांकडे आयपी अॅड्रेस होते.(Kirit Somaiya Korlai Visit: किरीट सोमय्या आज कोर्लई गावाला देणार भेट, ठाकरे परीवाराच्या कथीत बंगल्यांची करणार पाहणी)

यापूर्वी आयकर विभागाने चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांच्या विरोधात टॅक्स चोरी तपासाअंतर्गत मुंबई आणि चेन्नई स्थित त्यांच्या परिसरात छापेमारी केली होती. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, या कारवाईचा उद्देश दोन लोकांच्या विरोधात टॅक्स चोरी आणि आर्थिक अनियमिततांच्या आरोपांचा तपास करण्यासह पुरावे एकत्रित करायचे आहेत. खरंतर त्यांनी एक्सचेंजची गुप्त माहिती तिसऱ्यासोबत शेअर करुन अवैध आर्थिक लाभ मिळवला. आयकर विभागाच्या मुंबई तपास शाखेने रामकृष्ण आणि सुब्रमण्यम यांच्या परिसरात गुरुवारी पहाटे छापेमारी केली. अधिकाऱ्यांनी म्हटले की, रामकृष्ण यांच्या चैन्नई येथील एका परिसरात सुद्धा छापेमारी केली. तपासकर्त्यांनी त्या परिसरातील सर्व काही कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली आहेत.