आता वाहन परवानासाठी RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही; पहा काय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवा नियम

हा नवा नियम जुलै पासून लागू होण्याची शक्यता आहे.

Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

भारतामध्ये वाहन परवाना (Driving License) मिळवण्यासाठी सारख्या आरटीओच्या फेर्‍या माराव्या लागतात. मग त्यामध्ये कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी काळाबाजार, भ्रष्ट्राचार होतो. पण आता नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी सरकारनेच मार्ग काढला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कडून जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांनुसार आता लोकांना आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. त्याऐवजी कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिग ट्रेनिंग स्कूलमध्ये नोंदणी करुन, तेथून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आणि एक टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार आहे. हा नवा नियम जुलै पासून लागू होण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये आता जे ड्रायव्हिंग सेंटर्स जागा, ड्रायव्हिंग ट्रॅक, आयटी आणि बायोमेट्रिक सिस्टिम आणि अन्य नियमांतर्गत ट्रेनिंगशी निगडीत आवश्यक बाबी पूर्ण करणार आता त्यांना सरकारकडून मान्यता मिळणार आहे. एकदा सेंटरमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाले की त्याचं प्रमाणपत्र मिळेल. ते प्रमाणपत्र संबंधित मोटर व्हेइकल वाहन परवाना अधिकाऱ्याकडे दिले जाणार आहे. आणि त्याचाच आधारे आता थेट वाहन परवाना दिला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. Fake Driving License : तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना? घरबसल्या ऑनलाईन असं करा चेक.

जुलै महिन्यापासून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवा नियम लागू होणार आहे त्यामुळे आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग इंस्टिट्युट चालवणार्‍या संस्थांना सरकारकडे अर्ज करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ड्रायव्हिंग लायसेन्स ट्रेनिंग आणि टेस्टची संपूर्ण प्रक्रीया इलेक्ट्रॉनिकली रेकॉर्ड केली जाणार आहे. त्यामुळे आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरकडून गाडी चालवायला शिकणार्‍यांना लायसन्ससाठी टेस्ट देण्याची गरज पडणार नाही.