GST रिटर्न फाईल न केल्यास आता प्रॉपर्टी आणि बॅंक अकाऊंट होऊ शकतात फ्रीज
त्यामुळे आता सरकारने नवे नियम आणले आहेत.
आता जीएसटी रिटर्न (GST Return)फाईल न करणं महागात पडण्याची शक्यता आहे. रिटर्न फाईल न केल्यास जर कोणती नोटीस दिली असेल आणि त्याला गंभीरतेने न घेतल्यास डिपार्टमेंट तुमची प्रॉपर्टी आणि बॅंक अकाऊंट फ्रीज करू शकतात. टाईम्स ऑफ इंडिया सोबतच्या खास मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीमध्ये नव्या नियमांना हिरवा कंदील दिला आहे. असं करण्यामागे जीएसटी रिटर्न फाईल करण्यामध्ये दिरंगाई होऊ नये ही आशा आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार,सुमारे 1 कोटी जीएसटी रजिस्ट्रेशन वेळेत करूनही रिटर्न फाईन करू शकले नाहीत. नव्या नियमानुसार अधिकार्यांना कारवाईच्या स्वरूपात तुमचं बॅंक अकाऊंट आणि संपत्ती अटॅच्ड करण्याचा अधिकार आहे. Budget 2020: आगामी अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना मिळू शकते मोठी खूषखबर; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची शक्यता.
टॅक्स अधिकार्यांच्या माहितीनुसार, फाईल रिटर्न करण्याच्या शेवटच्या तारखेच्या 3दिवसापूर्वीच त्याची सुरूवात करणं गरजेचे आहे. प्रत्येक महिन्यात 20 तारीख ही रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. 20 तारखेपर्यंत रिटर्न न भरल्यास सिस्टम जनरेटेड मेसेज सार्या डिफॉल्टर्सना पाठवला जातो. यासोबत सिस्टम संबंधित अधिकार्यांना त्याच्या सूचना पाठवण्यात येतात.
जर मासिक रिटर्न GSTR - 3B फाईल न केल्यास 5 दिवसांनंतर नोटिस पाठवली जाते. त्यानंतरही फाईलिंग न केल्यास 15 दिवसांनंतर असेसमेंट नोटीस पाठवली जाते. यापूर्वी व्हॅट आणि सर्विस टॅक्स होता मात्र आता जीएसटी आल्याने ते हटवण्यात आले आहेत.