Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण
राहुल गांधींच्या विधानावर झालेल्या गदारोळात, पक्ष या मुद्द्यावर झुकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पाठराखण करत त्यांच्या ब्रिटनच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. खरगे म्हणाले की, गांधींनी काहीही चुकीचे बोलले नाही आणि ते केवळ लोकशाहीबद्दल बोलले, तर पंतप्रधानांनी परदेशात अनेक ठिकाणी बोलून देशाचा अपमान केला. राहुल गांधींच्या विधानावर झालेल्या गदारोळात, पक्ष या मुद्द्यावर झुकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी कायम ठेवणार असून याबद्दल पक्ष आक्रमक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Opposition Leaders Protest March: अदानी मुद्द्यावरून विरोधकांचा संसद ते ED कार्यालय निषेध मोर्चा)
पीएम मोदींवर निशाणा साधत काँग्रेसचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले होते की, मी तुम्हाला चीनमध्ये दिलेल्या वक्तव्याची आठवण करून देऊ इच्छितो. तुम्ही म्हणालात, "पूर्वी तुम्हाला भारतीय असल्याची लाज वाटायची. आता तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो. हा भारताचा आणि भारतीयांचा अपमान नाही का? तुमच्या मंत्र्यांना त्यांच्या आठवणी ताज्या करायला सांगा!"
तुम्ही दक्षिण कोरियात म्हणालात, एक काळ असा होता की लोक विचार करायचे की, त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मात कोणते पाप केले आहे, ज्याचे फळ म्हणून ते भारतात जन्माला आले आहेत, यालाच तुम्ही देश म्हणता. यामुळे तुम्ही आरशात स्वत: पहिल्यांदा पहा असे ते म्हणाले! ब्रिटनमध्ये राहुल गांधी यांनी सभागृहाबाहेर केलेले वक्तव्य हा मुद्दाच नसल्याचे सांगत संसदेत झालेल्या गोंधळासाठी काँग्रेस सरकारला जबाबदार धरत आहे.