अन्न-पाण्याच्या अभावामुळे श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये एकाही मजुराचा मृत्यू नाही - केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल
मात्र केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हे मृत्यू अन्न-पाणी न मिळाल्याने झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
मूळगावी परत नेण्यासाठी भारतीय रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या होत्या. मात्र काही दिवसांतच त्यावरून राजकारणाला सुरूवात झाली. या श्रमिक स्पेशल ट्रेनमधून काही मजुर प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर विरोधकांनी अन्न-पाणी न मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर लावला होता. मात्र केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हे मृत्यू अन्न-पाणी न मिळाल्याने झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानेदेखील मजुरांच्या प्रवासासोबत त्यांच्या अन्न-पाण्याची सोय करण्याचे आदेश राज्य आणि केंद्र सरकारला दिले आहेत.
भारतामध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊन दरम्यान आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याने कामधंदा गमावलेले अनेक मजुर पायी गावाकडे निघाले. मात्र आता त्यामुळे अपघाती मृत्यू आणि कोरोनाचा धोका वाढत असल्याने सरकारने मर्यादीत मार्गांवर श्रमिक ट्रेन सुरू केल्या आहेत. यामधून मजुरांना मोफत आपल्या गावी पोहचवले जाते. मात्र यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. दहा दिवसांमध्ये या रेल्वेगाड्यांमध्ये ८० मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता. त्याला पियुष गोयल यांनी उत्तर देताना सारे आरोप फेटाळून लावले आहेत.
पीयुष गोयल ट्वीट
दरम्यान 7-9 दिवसांमध्ये मजुरांना आपल्या घरी पोहचवण्यात आले आहेत. तर एकाचाही मृत्यू अन्न किंवा पाणी न मिळाल्याने झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशात एकूण 1.9 कोटी रूपयांचे जेवण आणी 1.5 कोटी रूपयांचे पाणी दिले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाकडून आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी श्रमिक स्पेशल ट्रेनने न करण्याचं आवाहन केले आहे.