IPL Auction 2025 Live

Nirbhaya Gang-Rape & Murder Case: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा घटनाक्रम 2012 ते 2020; ठळक घडामोडींवर एक नजर

त्यापैकी 4 दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तर उर्वरीत दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन होता. त्यामुळे बालहक्क न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तर, या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने 2013 मध्ये तिहार कारागृहात आत्महत्या केली

Representational Image (Photo Credits: PTI)

Nirbhaya Gang-Rape & Murder Case Incident:  एक दोन नव्हे तर तब्बल 7 वर्षांनंतर निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gang-Rape) आणि हत्या प्रकरणात दिल्ली येथील पटीयाला न्यायालयाने आपला निकाल दिला. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या चारही दोषींविरोधात कोर्टाने डेथ वॉरंट जारी केले. येत्या 22 जानेवारी 2020 या दिवशी सकाळी 7 वाजता या चौघांवर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी असे न्यायालयाने म्हटले आहे. या चारही आरोपींकडे आता केवळ 14 दिवसांचा अवधी आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत घडलेल्या ठळक घडामोडींवर ही एक नजर.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण सहा आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यापैकी 4 दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तर उर्वरीत दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन होता. त्यामुळे बालहक्क न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तर, या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने 2013 मध्ये तिहार कारागृहात आत्महत्या केली. या प्रकरणातील सर्वच आरोपी तिहार कारागृहात होते.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा घटनाक्रम 2012 ते 2020

16 डिसेंबर 2012 या दिवशी दिल्ली येथे निर्भया आणि तिचा मित्र बसमधून प्रवास करत होता. या वेळी 6 जणांनी निर्भया हिच्यावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी निर्भया आणि तिच्या मित्राला जबर मारहाण केली. या मारहाणीत निर्भया आणि तिचा मित्र मृत झाला असे संमजून आरोपींनी या दोघांनाही रस्त्यावरच फेकून दिले. मात्र, हे दोघे जिवंत परंतू गंभीर जखमी होते. या दोघांना उपचारासाठी सिंगापूरला पाठविण्यात आले. 29 डिसेंबर 2012 या दिवशी सिंगापूर येथील रुग्णालयात निर्भया हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

निर्भया प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींपैकी एक आरोपी राम सिंह याने तिहार कारागृहात 11 मार्च 2013 या दिवशी आत्महत्या केली. 13 डिसेंबर 2013 या दिवशी कनिष्ट न्यायालयाने या प्रकरणातील चार दोषी पवन शर्मा, विनय शर्मा, मुकेश आणि अक्षय याला फाशीची शिक्षा दिली. 13 मार्च 2014 या दिवशी दिल्ली उच्च न्यायालयाने सर्वचच्या सर्व चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. 5 मे 2017 या दिवशी सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली उच्च न्यायालयाचा फाशीचा निर्णय कायम ठेवला. 9 जुलै 2018 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील तिन्ही आरोपींची (विनय, पवन आणि मुकेश) पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. (हेही वाचा, Nirbhaya Case: आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता होणार फाशी)

निर्भयाच्या आई वडीलांनी 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी दिल्ली येथील पटीयाला हाऊस कोर्टात निर्भया प्रकरणातील सर्व दोषींना त्वरीत फाशी द्यावी असा अर्ज केला. 6 नोव्हेंबर 2019 या दिवशी या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. 1 डिसेंबर 2019 या दिवशी दिल्ली सरकारने गृह मंत्रालयाकेड दया अर्ज फेटाळून लाववा अशी मागणी केली. 6 डिसेंबर 2019 या दिवशी गृहमंत्रालयाने रष्ट्रपतींकडे आरोपींचा दया अर्ज फेटाळून लावावा अशी शिफारस केली. 10 डिसेंबर 2019 या दिवशी या प्रकरणाती चौथा दोषी आरोपी कुमार सिंह याने सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार याचिका दाखल केली. 18 डिसेंबर 2019 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. 7 जानेवारी न्यायालयाने चारही आरोपींना फाशीची शिक्षा कायम ठेवत 22 जानेवारी 2020 या दिवशी सकाळी 7 वाजता या चौघांवर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी असे न्यायालयाने म्हटले.