Nirbhaya Case: निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपींच्या 22 जानेवारी दिवशी होणार्या फाशीवर सस्पेंस
यावेळेस जोपर्यंत राष्ट्रपती दया याचिका फेटाळत नाहीत तो पर्यंत फाशी होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितल्याने आता निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीवर सस्पेंस कायम आहे.
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, आरोपींच्या दया याचिकांवर सुनावणी केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची नोटीस आवश्यक आहे. दरम्यान आता दया याचिका (Mercy Petition Nirbhaya Case)फेटाळल्यानंतर त्यांना वेळ देण्यात यावा असा युक्तिवाद करत 22 जानेवारीची फाशी पुढे ढकलण्यासाठी वकिल प्रयत्न करत आहेत. Nirbhaya Case: आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता होणार फाशी.
वकिल राहुल मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारीला निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होऊ शकत नाही. यावेळेस जोपर्यंत राष्ट्रपती दया याचिका फेटाळत नाहीत तो पर्यंत फाशी होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितल्याने आता निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीवर सस्पेंस कायम आहे.
ANI Tweet
दिल्लीच्या पटियाला कोर्टाने 7 जानेवारी दिवशी निर्भयाच्या आरोपींना येत्या 22 जानेवारी दिवशी फाशी देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आरोपींनी केलेली पुनर्विचार याचिका देखील फेटाळण्यात आली आहे. आरोपींच्या फाशीसाठी तिहार जेलमध्ये फाशी साठी तयारी सुरू असल्याचेही मीडिया रिपोर्ट्समधून पुढे आले होते.