Central Railway Block: मध्य रेल्वेवर 2 दिवस रात्रकालीन ब्लॉक, एक्स्प्रेसचा खोळंबा; वेळापत्रक पहा
त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. हा रात्रकालीन ब्लॉक असला तरी देखील यामुळे लोकलसेवा आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम होणार आहे.
Central Railway Block: मध्य रेल्वे (Central Railway)मार्गावर 21-22 डिसेंबर म्हणजेच शनिवार- रविवारच्या मध्यरात्री आणि 22-23 डिसेंबर म्हणजेच रविवार-सोमवारच्या मध्यरात्री रात्रकालीन ब्लॉक (Railway Night Block) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि कल्याण - कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागात अप आणि डाउन धिम्या आणि जलद मार्गांवर, पाचव्या आणि सहाव्या मार्गावर काम करण्यात येणार आहे.
1-22 डिसेंबरचा विशेष रात्रकलीन ब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर 21-22 डिसेंबरला मध्यरात्री 1 ते 4.30 वाजेपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान, उल्हासनगर येथे 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज, कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेटच्या जागी आरओबी आणि नेरळमध्ये 6 मीटर रुंद एफओबी हे काम करण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या नियमनामध्ये बदल करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक 11087 डाउन वेरावळ- पुणे एक्सप्रेस भिवंडी स्थानकावर 10 मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण
खालील डाऊन गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 5 व्या मार्गिकेवर वळवण्यात येतील -
ट्रेन क्रमांक 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
ईशान्य दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कल्याण आणि दिवा/ठाणे स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवण्यात येतील -
ट्रेन क्रमांक 18030 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 20104 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 11402 बल्हारशाह - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस
दक्षिण-पूर्व दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कर्जत- पनवेल मार्गे वळवल्या जातील आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवल्या जातील
ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 11140 हॉस्पेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
22-23 डिसेंबरचा विशेष रात्रकलीन ब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर 22-23 डिसेंबरला मध्यरात्री 2 ते 5.30 वाजेपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. गर्डर लाँच करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तिसरा नवीन पत्रीपुल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान हा गर्डर लाँच करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि ठाणे विभागांमध्ये उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
ट्रेन क्रमांक 18030 अप शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 12810 अप हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस अनुक्रमे टिटवाळा आणि खडवली स्थानकांवर 15 मिनिटांनी नियमित केली जातील. तर ट्रेन क्रमांक 12132 अप साईनगर शिर्डी - दादर एक्स्प्रेसही उशिराने धावणार आहे.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन -
गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवली जाईल.
गाडी क्रमांक 11020 वगळता सर्व सहाव्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालतील.
21 डिसेंबरला खालील उपनगरीय गाड्यांचे विस्तारित /शॉर्ट टर्मिनेटेड -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 23.16 वाजता सुटून कसारापर्यंत चालेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 23.42 वाजता सुटेल आणि ती ठाणेपर्यंत चालेल.