NIA Raids:एनआयएची धडक कारवाई, एकाच वेळी सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे; दहशतवाद, नक्षलवाद, ड्रग्ज तस्करी प्रकरण

हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab), राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh या सहा राज्यांमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एकाच वेळी 100 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे.

NIA | (Photo Credits: Twitte/ANI)

हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab), राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh या सहा राज्यांमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एकाच वेळी 100 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. दहशतवादी-अमली पदार्थांचे तस्कर-गुंडांच्या संगनमताने अनेक ठिकाणी बेकायदेशीर कृत्ये सुरु असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केली. दहशतवादविरोधी एजन्सीने राज्य पोलिस दलांसोबत ही कारवाई संयुक्तरित्या केली. बुधवार पहाटेपासून परिसर आणि संशयितांशी संबंधित इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असून, कारवाई अद्यापही सुरुच आहे.

एनआययएने या वर्षात साधारणपणे तीन वेळा मोठी कारवाई करत तीन वेळा छापेमारी केली आहे. एजन्सीने यावर्षी 25 जानेवारी रोजी मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स मुख्यालयावर आरपीजी हल्ल्यातील मुख्य शूटर दीपक रंगा याला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून RC-37/2022/NIA/DLI या प्रकरणात अटक केली होती. कॅनडास्थित गुंड-दहशतवादी लखबीर सिंग संधू ऊर्फ लंडा आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर-दहशतवादी हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा यांचा तो जवळचा सहकारी होता. आरपीजी हल्ल्यातील त्याच्या सहभागाव्यतिरिक्त, दीपक इतर अनेक हिंसक दहशतवादी आणि गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सामील आहे. ज्यात हत्यांचा समावेश आहे.

विदेशी दहशतवादी संघटना आणि दहशतवादी घटक देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे नेते आणि सदस्य यांच्यासोबत मिळून लक्ष्यित हत्या आणि हिंसक घटना घडवून आणत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर एनआयएने 20 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा, Get Fit In 3 Months: 'येत्या 3 महिन्यांत 'फिट' व्हा अथवा निवृत्ती घ्या'; लठ्ठ पोलिसांना चेतावणी, चेक होणार BMI, जाणून घ्या सविस्तर)

दहशतवादी-गुंड-ड्रग स्मगलर नेटवर्क गुन्हेगारी कृत्ये, शस्त्रे, दारूगोळा स्फोटके, आयईडी इत्यादी दहशतवादी हार्डवेअरची तस्करी करण्यात गुंतले होते, ते बंदूक चालवणारे, बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा उत्पादक आणि पुरवठादारांच्या व्यापक आंतरराज्य नेटवर्कद्वारे सीमा ओलांडून या कृत्यात गुंतलेल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.

वरील दहशतवादी-गुंड-अमली पदार्थ तस्कर नेटवर्कविरुद्ध गुन्हेगारी खटल्यांची नोंद झाल्यापासून, NIA ने बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) अंतर्गत यापूर्वीच 19 नेते आणि विविध संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य, दोन शस्त्र पुरवठादार आणि नेटवर्कशी जोडलेले एक मोठे वित्तपुरवठादार यांना अटक केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now