2017 मध्ये लेथपोरा येथील CRPF कॅम्पवर हल्ला करणारा दहशतवादी निसार अहमद भारताच्या ताब्यात

जैश-ए-मोहम्मदचा फरार दहशतवादी निसार अहमद याला पकडण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणांना यश आले आहे.

Indian Army | Image Used for representational purpose only | (Photo Credits: Getty Images)

जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) फरार दहशतवादी निसार अहमद (Nisar Ahmed) याला पकडण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणांना यश आले आहे. युएईमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या निसारला आता भारतात आणण्यात आले आहे. निसार हा मूळचा जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी असून 2017 मध्ये  झालेल्या लेथपोरा येथील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यातील निसार हा मुख्य आरोपी आहे. 30 डिसेंबर 2017 च्या मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफ चे पाच जवान शहीद झाले. तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैनिकांना यश आले.

एनआयएने ( NIA) निसारच्या एका सहकार्याला अटक करण्यात आल्यानंतर 1 फेब्रुवारीला तो युएईला (UAE) फरार झाला. निसारला पोलिसांनी एनआयए न्यायालयात सादर करण्यात आले. 26 डिसेंबर 2017 मध्ये पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातलेला जैश कमांडर नूर तांत्रे याचा निसार हा लहान भाऊ आहे.

ANI ट्विट:

 

लेथपोरा येथे झालेल्या हल्ल्याच्या तपासणीची जबाबदारी एनआयए ला देण्यात आली होती. या हल्ल्यात फरदीन अहमद (Fardeen Ahmed), मंजूर बाबा (Manzoor Baba) आणि अब्दुल शकूर (Abdul Shakoor) हे तीन दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले होते. यातील दोघेजण पुलवामाचे रहिवासी होते. तर अब्दुल हा पाकिस्तानचा नागरिक होता.