New Year 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा '2020 हे वर्ष आनंद घेऊन येईल'
आपल्या ट्विटमध्ये मोदी यांनी हे वर्ष भारताला बदलण्यासाठी आणि लोकाना सशक्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल असा आशावादही व्यक्त केला आहे
New Year 2020: पतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहे. नववर्षाच्या पुर्वसंध्येला 2019 या सरत्या वर्षाला निरोप (Good By 2019) देत 2020 हे वर्ष देशवासियांच्या जीवनात आनंद घेऊन येईल असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये मोदी यांनी हे वर्ष भारताला बदलण्यासाठी आणि लोकाना सशक्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल असा आशावादही व्यक्त केला आहे.
केंद्रातील एनडीए प्रणीत भाजप सरकारच्या कामगिरीवर नजर टाकणारा एक व्हिडिओ NaMo 2.0 या ट्विट हँडलने शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा गाण्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. या ट्विटला प्रतिक्रियेदाखल दिलेल्या उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी ट्विट
NaMo 2.0 ट्विटर हँडलचे हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रीट्विट करत लिहिले आहे की, 'अत्यंत सुंदर संपादन. 2019 मध्ये आम्ही खूप प्रगती केली. अपेक्षा आहे की, 2020 पर्यंत भारत बदलण्याचा आणि 130 कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न कायम राहतील.' (हेही वाचा, Happy New Year 2020 Wishes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून खास करा नव्या वर्षाचा पहिला दिवस!)
दरम्यान, जगभरातील काही ठिकाणी नववर्षाचे स्वागत झाले असून, काही ठिकाणी नववर्षाचा जल्लोष सुरुही झाला आहे. भारतात मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी अद्याप काही मिनिटे अवधी आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहरासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, तिरूअनंतपुरम, हैदराबाद, लखनौ, पाटना यांसारख्या शहरांतही खास तयारी करण्यात आली आहे. देशातील विविध ठिकाणचे समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळं आदी ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे. अशा या आनंदाच्या ठिकाणी कोणता अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.