आजपासून आयकर विभाग कार्यालयाकडून नवा नियम; टॅक्सचोरी करून पळवाट शोधणार्यांना बसणार चाप
रिवाइज्ड गाइडलाइन्स नुसार, ब्लैकमनी (अघोषित फॉरेन इनकम आणि एसेट्स) अॅन्ड इंपोजिशन ऑफ टैक्स एक्ट, 2015 अनुसार तुम्ही यामधील कोणता प्रकार केल्यास तो गंभीर गुन्हा असू शकतो.
अनेकदा कम्पाऊंडींग म्हणजेच मोठ्या रक्कमेवरील आयकर न भरता त्याची पेनाल्टी भरून पळवाट काढण्याची सोय आता बंद झाली आहे. त्यामुळे आता काळा पैसा परदेशात घेऊन जाणार्यांना आता रोखणं शक्य होणार आहे. आयकर विभागाने अधिक कडक नियम करत अशा धनाढ्यांवर चाप बसवण्यासाठी नवे नियम आणले आहेत. आज (17 जून) पासून हे नवे नियम अंमलात आणले जाणार आहेत. Central Board of Direct Taxes कडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार, 13 विविध गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने आपल्या अधिकार्यांना त्यांचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे टॅक्सचोरी करणं किंवा त्याच्याशी निगडीत कोणत्याही प्रकारांमध्ये जर तुम्ही त्या 13 गोष्टींमध्ये येत असल्यास त्याला गुन्हा म्हणून मानलं जाणार आहे.
रिवाइज्ड गाइडलाइन्स नुसार, ब्लैकमनी (अघोषित फॉरेन इनकम आणि एसेट्स) अॅन्ड इंपोजिशन ऑफ टैक्स एक्ट, 2015 अनुसार तुम्ही यामधील कोणता प्रकार केल्यास तो गंभीर गुन्हा असू शकतो.