New COVID-19 Variant Lambda चा जगात 30 देशांमध्ये शिरकाव; जाणून घ्या त्याच्या प्रसारापासून कोवीड 19 लसी विरूद्ध किती शक्तीशाली असल्याच्या दाव्यांबाबत सारे काही!
आज (7 जुलै) ANI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये अद्यापही लॅम्डाचा कोणताही संसर्ग आढळलेला नाही.
भारतामध्ये दुसर्या कोरोना लाटेला कारणीभूत डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) पेक्षा आता कोरोना वायरस मधील नवी प्रजात लॅम्डा (Lambda Variant) अधिक धोकादायक असू शकतो असं मलेशियन आरोग्य मंत्रालयाने (Malaysian Health Ministry) सांगितलं आहे. दरम्यान या नव्या वायरसच्या प्रकाराबददल त्यांनी भीती वर्तवली आहे. The Daily Star, च्या रिपोर्ट नुसार, आता संशोधकांनाही अशी भीती आहे की हा नवा वायरस अधिक वेगाने पसरू शकतो असू शकतो. दरम्यान आज (7 जुलै) ANI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये अद्यापही लॅम्डाचा कोणताही संसर्ग आढळलेला नाही. Delta and Delta Plus Variants FAQs: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टस: वारंवार विचारले जाणारे प्रश्न आण त्यांची उत्तरे.
सध्या लॅम्डा व्हेरिएंट बददल उपलब्ध असलेली माहिती काय?
- Lambda variant हा पेरू मध्ये पहिला आढळला आहे. तेथे त्याचं उगमस्थान आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून अंदाजे 80% पेरू मधील कोरोनारूग्ण हे या नव्या व्हेरिएंटचे आहेत.
- साऊथ अमेरिका, युके सहा आता हा नवा कोरोना वायरस व्हेरिएंट जगात 30 देशांमध्ये आढळला आहे.
- पेरूमध्ये केलेल्या प्राथमिक अभ्यासामध्ये हा नवा वायरस चीनी कोविड 19 लस CoronaVac याच्या अॅन्टिबॉडीजला देखील चकवा देऊ शकतो.
- जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना वायरसचा हा नवा व्हेरिएंट आता Variant of Interest म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा अधिक वेगाने पसरू शकतो तसेच लसींसमोर अधिक शक्तीशाली ठरू शकतो.
- अद्याप Lambda variant अमेरिकेमध्ये मात्र US Centers for Disease Control and Prevention कडून मात्र Variant of Interest म्हणून जाहीर करण्ययत आलेला नाही.
सध्या जगभरात डेल्टा प्लस या व्हेरिएंट बद्दल चिंता व्यक्त केली जात असताना लॅम्डा बद्दल ची ही नवी माहिती समोर आली आहे. B.1.6172 हा डेल्टा व्हेरिएंट अतिशय वेगाने पसरत आहे. K417N, हे म्युटेशन व्हेरिएंट Delta (Plus) आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)