Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात, भूस्खलनामुळे त्रिशूली नदीत 63 प्रवासी असलेल्या दोन बस वाहून गेल्या, बचावकार्य सुरू

मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बसेस घसरून त्रिशूली नदीत वाहून गेल्या. बसमध्ये सुमारे 63 लोक होते. अपघातानंतर बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक भावेश रिमल यांनी सांगितले की, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.

Nepal Bus Accident

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बसेस घसरून त्रिशूली नदीत वाहून गेल्या. बसमध्ये सुमारे 63 लोक होते. अपघातानंतर बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक भावेश रिमल यांनी सांगितले की, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. सध्या पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. दहाल यांनी X वर लिहिले की, नारायणगड-मुग्लिन रोड सेक्शनवरील भूस्खलनामुळे बस वाहून गेल्याने अनेक प्रवासी  बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने आणि पूर-भूस्खलनामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे. मी देशाच्या विविध भागात गृह प्रशासनासह सरकारच्या सर्व यंत्रणांना प्रवाशांचा शोध घेण्याचे आणि त्यांची प्रभावीपणे सुटका करण्याचे निर्देश दिले.

नेपाळमध्ये बस अपघात:

पीएम दहल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला

व्हिडिओ पहा:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एंजल बस आणि गणपती डिलक्स या दोन बस राजधानी काठमांडूला जात होत्या. पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे दोन्ही बस नदीत घसरून वाहून गेल्या. मात्र, अपघातानंतर काही प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याचे वृत्त आहे. त्यांनीच पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले.