Uttar Pradesh Assembly Election: घड्याळ सांगणार सायकलची वेळ? उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत NCP आणि Samajwadi Party आघाडीची चर्चा

दोन्ही पक्षांकडून अद्या कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही.

Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आघाडी करण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून अद्या कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही. परंतू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी के. के. शर्मा यांनी म्हटले आहे की, 'शरत पवार यांची भूमिका आहे की, कोणत्याही स्थिती भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये प्रमुख विरोधी पक्षासोबत आघाडी (NCP and SP likely Alliance) करुन निवडणूक लढायला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार यांनी नुकतीच या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर पक्षातील प्रमुख नेत्यांशी विस्ताराने चर्चा केली. दरम्यान, आघाडी करुन निवडणूक लढायची झाल्यास कोणी किती जागांवर लढायचे याबाबत मात्र दोन्ही पक्षात अद्याप कोणतीच चर्चा झाली नसल्याची माहितीआहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष उमा शंकर यादव यांनी म्हटले की, जागावाटपावर काम सुरु आहे. आम्ही कमी जागांवर निवडणूक लढण्यास तयार आहोत. आम्ही केवळ उत्तर प्रदेश विधानसभेत आमचे काही आमदार निवडूण आणू इच्छितो.

उत्तर प्रदेशमध्ये पुढच्याच वर्षी निवडणुका होऊ घातल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सध्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे बहुमतातील सरकार आहे. कोरोना महामारीत उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारची कामगिरी, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची कामगिरी अशा सर्वांचाच परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनीही उत्तर प्रदेश राज्यावर लक्ष ठेवले आहे. तर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष सध्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. मायावती यांच्या बसपा पक्षाची भूमिका या निवडणुकीत कशी असेल याबाबत मात्र अद्यापही कोणती स्पष्टता नाही.