Navjot Sidhu: नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून उद्या सुटका
सिद्धू यांनी 20 मे 2022 रोजी पटियाला मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) यांच्यासमोर शरणागती पत्करली होती.
रोड रेज प्रकरणात पटियाला (Patiala Jail) कारागृहात शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2013 रोजी सुटका होणार आहे. सिद्धू यांनी 20 मे 2022 रोजी पटियाला मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) यांच्यासमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना पटियाला कारागृहात पाठविण्यात आले. नियमानूसार सिद्दू यांची सुटका 26 जानेवारी 2023 रोजी होणार होती. मात्र, शिक्षेदरम्यान सुट्टी न घेण्याचा फायदा सिद्दू यांना झाला.
नवजोत सिंह सिद्धू यांनी क्रिकेटपटू म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर ते राजकारणात उतरले. सोबतच 'द कपील शर्मा शो' यांसारख्या टीव्ही कार्यक्रमांतून घराघरांतही पोहोचले. सिद्धूला यांना त्यांच्या सुटकेसाठी 19 मे पर्यंत वाट पाहावी लागणार नाही. कायदेतज्ज्ञांच्या मते, एका महिन्यात नेमून दिलेल्या कामाची प्रगती आणि कैद्यांच्या वर्तनानुसार त्यांना 4 ते 5 दिवसांची विश्रांती दिली जाते. याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही लाभ कैद्यांना मिळतो. नवज्योत सिद्धूने त्याच्या संपूर्ण शिक्षेदरम्यान एकाही दिवसाची सुट्टी मागितली नाही. त्यामुळेच सिद्धूची 1 एप्रिलला सुटका होणार आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या सुटकेची चर्चा डिसेंबर 2022 पासून सुरू झाली होती. त्यांच्या स्वागताच्या तयारीत पंजाब काँग्रेसचे काही आमदार आणि नेतेही सहभागी झाले होते. मात्र सिद्धूची सुटका होऊ शकली नाही. सुमारे 56 जणांची फाईल जेल प्रशासनाने तयार केली होती, ज्यांना चांगल्या वागणुकीमुळे तुरुंगातून सोडण्यात येणार होते. मात्र प्रजासत्ताक दिनापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला नाही. सिद्दू यांची सुटका झाली नाही.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग आणि खासदार मनीष तिवारी यांनी कैद्यांच्या यादीत नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव समाविष्ट न केल्याबद्दल आम आदमी सरकारवर हल्लाबोल केला होता. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना मे महिन्यात एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. सिद्धूने 20 मे रोजी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आणि त्याची रवानगी पटियाला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत अमृतसर (पूर्व) मतदारसंघातून पराभव झाला.