National Startup Awards 2021: लवकरच DPIIT कडून होणार राष्ट्रीय स्टार्टअप अवॉर्ड्सची घोषणा; रोख बक्षीसासह मिळणार अनेक नव्या संधी, जाणून घ्या कुठे कराल अप्लाय

विजेत्याबरोबरच दोन उप विजेत्यांना पायलट प्रकल्पासाठी त्यांची उत्पादने आणि सेवा शासकीय अधिकारी आणि उद्योगांसमोर सादर करण्याची संधी दिली जाईल

Ministry of Commerce & Industry (Photo Credits: ANI)

उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) लवकरच राष्ट्रीय स्टार्टअप अवॉर्ड्स 2021 (NSA 2021) घोषित करणार आहे. कोरोना साथीच्या आपत्तीच्या वेळी स्टार्टअपद्वारे केले गेलेले चांगले प्रयत्न आणि त्यांच्या पुढाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी एनएसए 2021 मध्ये पुरस्कारांच्या अतिरिक्त श्रेण्यांचा समावेश केला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अधिक चांगले देशी पर्याय सादर करणार्‍या अशा नवकल्पनांना मान्यता देणे हेदेखील त्याचे उद्दीष्ट आहे. या पुरस्कारांसाठी 31 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करता येतील. या पुरस्कारासाठी अर्ज करायचा असेल तर www.startupindia.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती प्राप्त होऊ शकेल.

हा पुरस्कार 15 वेगवेगळ्या क्षेत्रातील 49 वर्गीकृत पर्यायांना देण्यात येणार आहे. या 15 क्षेत्रांमध्ये शेती (Agriculture), पशुसंवर्धन (Animal Husbandry), पिण्याचे पाणी (Drinking Water), शिक्षण आणि कौशल्य विकास (Skill Development), ऊर्जा (Energy), उपक्रम प्रणाली (Enterprise Systems), पर्यावरण, फिनटेक, खाद्य प्रक्रिया (Food Processing), आरोग्य आणि निरोगीपणा, उद्योग 4.0, सुरक्षा, अंतराळ, मालवाहतूक आणि प्रवास सामील आहे.

याखेरीज शैक्षणिक संस्था, ग्रामीण भागात बदल, महिला उद्योजक, आयात पर्यायांची शक्यता, कोविड-19 मधील लढाईत नाविन्यपूर्ण आणि भारतीय भाषांमध्ये लेख उपलब्ध करणे अशांशी निगडीत स्टार्टअप्ससाठी 6 विशेष पुरस्कारही दिले जातील. याशिवाय बेस्ट इनक्यूबेटर आणि एक्सेलेटर प्रकारातही पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सर्व क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवडलेल्या स्टार्टअपला पाच लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. विजेत्याबरोबरच दोन उप विजेत्यांना पायलट प्रकल्पासाठी त्यांची उत्पादने आणि सेवा शासकीय अधिकारी आणि उद्योगांसमोर सादर करण्याची संधी दिली जाईल. स्टार्टअपशी संबंधित विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासही त्यांना प्राधान्य दिले जाईल. इनक्यूबेटर आणि एक्सेलेटर प्रवर्गातील प्रत्येकी एक विजेता घोषित केला जाईल आणि त्यांना प्रत्येकी 15 लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात येईल. (हेही वाचा: केंद्र सरकारचा निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा; Life Certificate सादर करण्यासाठी दिली मुदतवाढ)

दरम्यान, डीपीआयआयटीने 2019 मध्ये राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांची सुरूवात केली होती. रोजगार निर्मिती, भांडवल वाढविणे आणि समाजात बदल घडवून आणण्यासाठी नवीन प्रकारच्या सेवा आणि उत्पादनांद्वारे स्टार्टअपने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांना मान्यता देणे हे त्याचे उद्दीष्ट होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif