Rahul Gandhi on PM Narendra Modi: 'काय कराचं ते करा! आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही', राहुल गांधी आक्रमक
काँग्रेस (Congress) नेते आणि वायनाड येथील खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाटते आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन ते आमचा आणि इतर विरोधी पक्षांचा आवाज बंद करु शकतील.
काँग्रेस (Congress) नेते आणि वायनाड येथील खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाटते आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन ते आमचा आणि इतर विरोधी पक्षांचा आवाज बंद करु शकतील. ते तसा कट करत आहेत. केंद्र सरकार दबावाच्या राजकारणाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. परंतू, मी त्यांना सांगू इच्छितो की, काय करायचं ते करा. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राहुल गांधी यांची सलग पाचव्या दिवशी 50 तास चौकशी केली होती. नॅशनल हेरॉल्ड (National Herald) प्रकरणाशी संबंधित कथीत मनी लॉन्ड्रींग प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांची चौकशी केली आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi: सरतेशेवटी सत्याचा विजय आणि अहंकाराचा पराजय होणार, संजय राऊतांना पाठींबा दर्शवत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल)
ट्विट
राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतना म्हटले की, जर आपण नॅशनल हेरॉल्डबाबत बोलत असाल तर, संपूर्म प्रकरण केवळ घाबरविण्यासाठी आणि धमकाविण्यासाठी आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना वाटते की, थोडा दबाव टाकला तर आम्ही गप्प बसू. परंतू, आम्ही असे होऊ देणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लोकशाहीविरोधात जे काही करायचे आहे ते त्यांनी करावे. राहुल गांधी यांनी म्हटले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाद्वार दिल्ली येथे यंग इंडियन कार्यालयाला सील केल्यानंर काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी राहुल गांधी पत्रकारांशी बोलत होते.
ट्विट
राहुल गांधी यांनी म्हटले की, देश आणि लोकशाहीची रक्षा तथा सद्भाव कायम राखण्यासाठी ते कायम लढाई लढत राहतील. भाजपच्या एका आरोपाबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, पळायची भाषा कोण करत आहे? तेच पळपूटेपणाची भाषा करत आहेत. आम्ही घाबरणारे नाही आहोत. आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबर नाही. काय करायचे ते करा, आम्हाला काही फरक पडत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)