National Democratic Alliance: नीतीश कुमार यांच्या भूमिकेमुळे NDA ला धक्का, राज्यसभेत  भाजप अडचणीत

बहुमताच्या दृष्टीने राज्यसभेत भाजप पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही बहुमत काहीही करुन मिळवायचेच असा भाजपचा विचार होता. मात्र त्याला जनता दल यूनायटेड (JDU) प्रमुख तथा बिहारचे मुख्यमत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी खिळ घातली आहे.

Amit Shah Nitish Kumar Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप (BJP) प्रणित एनडीएला (National Democratic Alliance) राज्यसभेत (Rajya Sabha) पुन्हा एकदा धक्का बसला आहे. बहुमताच्या दृष्टीने राज्यसभेत भाजप पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही बहुमत काहीही करुन मिळवायचेच असा भाजपचा विचार होता. मात्र त्याला जनता दल यूनायटेड (JDU) प्रमुख तथा बिहारचे मुख्यमत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी खिळ घातली आहे. नीतीश कुमार यांनी भाजपचा हात सोडत पुन्हा एकदा महागठबंधनमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसोबतच्या सरकारचा राजीनामा देऊन नितीश यांनी महागठबंधनचे नवे सरकार स्थापन केले. तसेच, नव्या सरकारचा आज (10 ऑगस्ट) शपथविधीही पार पडला. नितीश यांनी मुख्यमंत्री तर आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली.

एनडीएला धक्का

भाजप प्रणित एनडीए सोडणारा पाठिमागील तीन वर्षांतील जनता दल युनायटेड हा तिसरा पक्ष आहे. या आधी शिवसेना, त्यानंतर अकाली दल या पक्षांनी एनडीएची पर्यायाने भाजपची साथ सोडली आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जुने मित्र पक्ष होते.दरम्यान, पाठिमागच्या लोकसभा निवडणूक (2019) पूर्वी तेलुगू देशम पक्षानेही एनडीएतून काढता पाय घेतला आहे. (हेही वाचा, Nitish Kumar-Tejashwi Yadav Swearing: नीतीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्री, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री; बिहारमध्ये भाजपला धक्का)

बिहारची सत्ता गेलीच, राज्यसभेतही अडचण

नीतीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर भाजपला केवळ बिहारचीच सत्ता गमवावी लागणार नाही. तर त्यासोबतच संसदेतही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये महत्त्वाचे निर्णय आणि विधेयके मंजूर करण्यासाठी भाजपला आता बीजू जनता दल (BJD) आण आंध्र प्रदेशच्या वायएसआर काँग्रेस (YSRCP) यांसारख्या पक्षांवर निर्भर राहावे लागू शकते.

एनडीएची राज्यसभेतील विद्यमान स्थिती

BJP: 91

AIADMK: 4

SDF: 1

RPIA: 1

AGP: 1

PMK: 1

MDMK: 1

तमिल मानिला कांग्रेस : 1

NPP: 1

MNF: 1

UPPL: 1

निर्दलीय : 1

मनोनीत : 5

दरम्यान, जेडीयू जेव्हा एनडीएचा घटक होती तेव्हाही राज्यसभेत एनडीएच्या बाजून बहुमत नव्हते. राज्यसभेत सध्या एकूण खासदारांची संख्या 237 इतकी आहे. त्यासाठी बहुमताचा आकडा 119 आहे. जम्मू-कश्मीरमधून 4, त्रिपूरातून 1 आणि नामनिर्देशीत 3 जागा रिक्त आहेत. याशिवाय एक अपक्ष आणि 5 नामनिर्देशित सदस्य यांसह एनडीएतील एकूण सदस्यांची संख्या 115 इतकी आहे. जनता दल युनायटेड बाहेर गेल्यास हा आकडा 110 वर येतो. त्यामुळे एनडीएला बहुमतासाठी आणखी 9 जागांची व्यवस्था करावी लागणार आहे. राज्यसभेत जेडीयूचे 5 खासदार आहेत. ज्यात उपसभापती हरिवंश यांचाही समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif