K-9 Howitzer तोफेमधून सफर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हजीरा मध्ये लार्सन अँड टूब्रो ने निर्माण केलेल्या होवित्जर तोफचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी हजीरा (Hazira) मध्ये लार्सन अँड टूब्रो (Larsen and Toubro) ने निर्माण केलेल्या होवित्जर (Howitzer) तोफचे उद्घाटन केले. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वेगळे रुप पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी स्वत: एल अँड टी मध्ये तयार करण्यात आलेल्या के-9 होवित्जर तोफेचे (K-9 Howitzer) निरीक्षण केले आणि यातून सफरही केली. खुद्द मोदींनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
स्वयं चलित के9 वज्र होवित्जर तोफांची निर्मिती करणारे भारतातील हे पहिले युनिट असेल. एल अँड टी ने 2017 मध्ये 'मेक इन इंडिया' या योजने अंतर्गत भारतीय सेनेला के9 वज्र टी 155 मिलिमीटर ट्रॅक्ड सेल्फ प्रोपेल्ड तोफ प्रणालीच्या 100 युनिटची पूर्तता करण्यासाठी 4500 कोटी रुपयांचा करार केला होता.
कंपनीने या तोफांच्या निर्मितीसाठी सुरत येथून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर हजीरा केंद्रात आर्मर्ड सिस्टम्स कॉम्प्लेक्स स्थापन केले होते. येथे स्व-चलित आर्टिलरी होवित्जर, सेनेची वाहने, लढाऊ वाहने आणि युद्ध ट्रॅक यांसारख्या वाहनांची निर्मिती केली जाते.
'के 9 थंडरबॉल्ट' कराराअंतर्गत 42 महिन्यांच्या आत 100 अशा प्रणाल्यांचा पुरवठा करायचा असून खाजगी कंपनीकडे संरक्षण मंत्रालयाने दिलेला हा सर्वात मोठा करार आहे.