नरेंद्र मोदी यांनी महाबलीपूरम येथे समुद्र किनाऱ्याची सफाई करत घेतला स्वच्छ भारत मिशन मध्ये सहभाग (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपूरम येथील एका समुद्रकिनारी प्लॉगिंग म्हणजेच जॉगिंग करत असताना पडलेला कचरा उचलतानाचा व्हिडीओ स्वतः आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर करत आपणही स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग घेत असल्याचे सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यातील दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेचा (Modi-Xi informal summit)आज दुसरा दिवस आहे. या दिवसाची सांगता करण्यासाठी आज मोदी आणि जिनपिंग यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होणार असून एका अनौपचारिक लंचचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र तत्पूर्वी मोदींचा एक खास व्हिडीओ सध्या समोर येत आहे, यामध्ये मोदी महाबलीपूरम (Mamallapuram) येथील एका समुद्रकिनारी प्लॉगिंग (Plogging) म्हणजेच जॉगिंग करत असताना पडलेला कचरा उचलताना पाहायला मिळतायत,हा व्हिडीओ मोदींनी स्वतः आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर करत आपणही स्वच्छ भारत मिशनमध्ये (Swachh Bharat Mission) सहभाग घेत असल्याचे सांगितले आहे. याआधी सकाळी मोदींनी याच समुद्रकिनारी व्यायाम करतानाचे देखील काही फोटो शेअर केले होते.
नरेंद्र मोदी यांचा हा बीच क्लिनिंग कार्यक्रम सुमारे 30 मिनिटे सुरु होता ज्या नंतर त्यांनी जमा केलेला कचरा हॉटेल स्टाफपैकी जेयाराज याच्याकडे सुपूर्त केला. हा व्हिडीओ शेअर करताना मोदींनी देशवासियांना सुद्धा स्वच्छतेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले तसेच फिट इंडिया अंतर्गत त्यांनी व्यायाम करण्याचा सल्ला देखील दिला.
नरेंद्र मोदी ट्विट
नरेंद्र मोदी यांच्या मन की बात च्या सप्टेंबर मधील कार्यक्रमात त्यांनी प्लॉगिंग बद्दल वाच्यता केली होती. यामुळे एकाच वेळी तंदरुस्ती आणि स्वच्छता अशी दोन्ही उद्दिष्ठे साध्य होतात म्ह्णून भारतीयांनी ही संकल्पना स्वीकारायला हवी असेही मोदी म्हणाले होते.
दरम्यान, मोदी आणि जिनपिंग यांचं भेटीवर सर्व जगाचे लक्ष वेधून आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक, सांस्कृतिक आणि जागतिक मुद्द्यांवर तसेच काश्मीर आणि दहशतवाद यावरही चर्चा झाली असू शकते, आजच्या शेवटच्या दिवसांनंतर दोन्ही देशांकडून संयुक्तरित्या एक पत्रक जाहीर करण्यात येईल ज्यामध्ये या चर्चेविषयी माहिती मिळेल.