Nandurbar Heavy Rain: नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पाच गावांचा संपर्क तुटला
नंदुरबार जिल्ह्यात तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Nandurbar) दरम्यान मंगळवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत. सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावातील संपर्क तुटला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (हेही वाचा - Weather Forecast Maharashtra: आज पाऊस पडेल का? जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान)
नंदुरबार जिल्ह्यात तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान मंगळवारी रात्रीपासून पावसाचे संततधार सुरू असल्याने अक्कलकुव्यातील सिंगपुर बुद्रूक गावाचा पुलावरून पाणी वाहू लागले आहे. अनेक भागातील शेतात पाणी शिरले. यामुळे मुसळधार पावसाने शेताला तलावाचे रूप आले आहे.
तळोदा तालुक्यातील सोरापाडा गावात पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. बस सेवा बंद करण्यात आली आहे. या गावातील तीन चार घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे चांगलेच हाल झाले आहे.