Myntra लवकरच बदलणार Logo; महिलांसाठी अपमानास्पद असल्याची तक्रार Mumbai Cyber Police कडे दाखल

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका एनजीओ वर्करने लोगो संदर्भात तक्रार दाखल केली होती. मिंत्राचा लोगो हा महिलांसाठी अपमानजनक आणि आक्षेपार्ह असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते.

Myntra's Logo (Photo Credits: Facebook)

ई-कॉमर्स फॅशन कंपनी मिंत्रा (Myntra) ने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका एनजीओ वर्करने (NGO Worker) लोगो (Logo) संदर्भात तक्रार दाखल केली होती. मिंत्राचा लोगो हा महिलांसाठी अपमानजनक आणि आक्षेपार्ह असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. यानंतर मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत महिन्याभराच्या आत लोगो बदलण्यास सांगितले होते.

रिपोर्टनुसार, एनजीओ Avesta Foundation चे नाझ पटेल यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल कडे तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, लोगो आक्षेपार्ह असून तो महिलांसाठी अपमानास्पद आहे. हा मुद्दा त्यांनी अनेक सोशल मीडिया माध्यमातूनही उपस्थित केला. त्यानंतर मुंबई सायबर सेलकडून कंपनीला लोगो ङटवण्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मिंत्रा कडूनही यावर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. वेबसाईट, अॅप आणि सर्व पॅकेजिंग प्रॉडक्टसवर लोगो बदलत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नवीन लोगोसहीत पॅकेजिंग मटेरियल प्रिटिंगच्या ऑडर्स यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

मिंत्रा चा लोगो महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आम्हाला आढळून आले. तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही मिंत्रा कंपनीला एक मेल केला. त्यानंतर त्यांचे अधिकारी आम्हाला भेटायला आले आणि महिन्याभराच्या आत आम्ही लोगो बदलतो असे त्यांनी सांगितले, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे डिसीपी रश्मी करंदीकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील