Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांची 15 कोटींसाठी हत्या? आर्थिक वादातून आपल्या पतीने हत्या केल्याचा महिलेचा दावा

एका दिल्लीस्थीत व्यवसायिकाच्या पत्नीने सतिश कौशीक यांची हत्या आपल्या पतीने केली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांसमोर केला आहे.

Satish Kaushik (PC - Instagram)

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या राजधानी दिल्लीत झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दिल्लीस्थीत व्यवसायिकांच्या पत्नीने सतिश कौशीक यांची हत्या आपल्या पतीने केली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांसमोर केला आहे. दिल्ली पोलीस आयुक्तालयात नोंद केलेल्या तक्रारीत या महिलेने म्हटले आहे की, "सतीश कौशिक यांची आपल्या पतीकडून पैसे मागत होते, जे ते देऊ इच्छित नव्हते." यासाठी आपल्या पतीने त्यांची हत्या केल्याचे महिलेने म्हटले.  (Satish Kaushik Death: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणाला नवे वळण; फार्म हाऊसवर सापडली आक्षेपार्ह औषधे)

या महिलेने दावा केला की तिने 13 मार्च 2019 रोजी व्यावसायिकाशी लग्न केले होते, कौशिकशी तिच्या पतीने ओळख करून दिली होती आणि सतिश कौशिक हे या महिलेला भारत आणि दुबईमध्ये नियमित भेटत असा दावा तीने केला आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते आणि तिच्या पतीकडून 15 कोटी रुपयांची मागणी केली होती.  यानंतर 24 ऑगस्ट रोजी पुन्हा दोघांत भेट होऊन पैशांवरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे या महिलेने म्हटले आहे. तसेच  यानंतर आपण कौशिक यांच्या मृत्यूची बातमी वाचली आणि आपल्याला दाट संशय आहे की आपल्या पतीने त्याच्या साथिदारांसह कौशिक यांची हत्या केली असावी. असे त्या महिलेने म्हटले आहे.

सतीश कौशिक यांना होळी पार्टीसाठी दिल्लीला बोलावले होते. राजोकरीतील वेस्ट एंड कॉलनी येथील एका आलिशान फार्म हाऊसमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेथून काही आक्षेपार्ह औषधेही जप्त करण्यात आली आहेत. ही पार्टी कशासाठी आयोजीत केली होती? तसेच या पार्टीत कोण-कोण सहभागी झाले होते? याचा शोध पोलिस घेत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement