लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूवर बलात्कार, नवरा, दीराचे कृत्य; सासू-सासऱ्यांकडून दाराला कडी

प्रकरणाचा तपास सुरु आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. अहवाल आल्यावर आणि तपास केल्यावर सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल.

Husband, brother-in-law gang-rape bride on first night after wedding | (Photo credit: archived, edited, symbolic images)

लग्न होऊन सासरी आलेल्या नववधूवर (Bridegroom) पहिल्याच रात्री (First Night After Wedding) नवरा आणि दीराने बलात्कार (Gang-Rape Bride) केल्याची घटना उत्तर प्रदेशातील (UP) मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे घडली आहे. धक्कादायक असे की, मानवतेला काळीमा लावणाऱ्या या प्रकारात मुलाचे आई-वडील म्हणजेच नववधूचे सासू , सासरेही सहभागी होते. ही घटना घडत असताना सासू-सासऱ्यांनी खोलीला बाहेरुन कडी लावल्याचे समजते. सासरकडील मंडळीस अधिक हूंडा हवा होता. नववधूने तिच्या माहेरुन हुंडा (Dowry) आणण्यासाठी दबाव टाकण्यासाठी सासरकडील मंडळींनी तिच्यावर सामुहीक बलात्कार केला.

बलात्कार झाल्यानंतर पीडित महिला ही रात्रभर घटनास्थळीच होती. दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 6 मार्च रोजी घडली. गेल्या रविवारी (10 मार्च) पीडितेने आपल्या कुटुंबीयांसोबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर या घटनेचे वृत्त प्रसारमाध्यमांनी गुरुवारी प्रसारीत केले. पीडितेवर बलात्कार केला तेव्हा नववधूचा पती आणि त्याचा भाऊ (दीर) दोघेही नशेत होते.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रातीत म्हटले आहे की, सासरकडील मंडळींना अधिक हुंडा हवा होता. त्यातून ते आपल्यावर (पीडिता) दबाव टाकू लागले. त्यानंतर पती आणि दीराने रात्री आपल्यावर सामुहीक बलात्कार केला. पीडितेच्या भावाने म्हटले आहे की, 'विवाहाच्या रात्री बहिणीचा पती आणि त्याचे कुटुंबीय नशेत होते. त्यांनी आपल्या बहिणीवर बलात्कार केला. बहिणीच्या विवाहासाठी मी लग्नाला 7 लाख रुपये खर्च केला. परंतू, सासरकडील मंडळींचा स्वार्थ अधिकच वाढला त्यांनी हुंड्यासाठी बहिणीचा छळ केला. (हेही वाचा, सेक्स टॉय वापरुन तरुणीचा महिलेवर बलात्कार; आरोपी तुरुंगात, एक दिवसाची न्यायालयीन कोठडी)

एसपी (ग्रामीण) आलोक कुमार यांनी सांगितले की, भारतीय दंड ,संहितेच्या विविध कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. अहवाल आल्यावर आणि तपास केल्यावर सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल.