पश्चिम बंगाल: 'जय श्री राम' म्हणायला नकार दिल्याने मुस्लिम तरुणाला धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले
यामध्ये सुदैवाने तरुणाला गंभीर जखम झालेली नाही.
'जय श्री राम' (Jai Shree Ram) या एका घोषणेमुळे सध्या देशात प्रचंड वाद सुरु आहेत. राजकीय मंडळींसोबत आता सामान्य जनता सुद्धा या घोषणेसाठी आक्रमक झालेली पाहायला मिळते. त्यातही पश्चिम बंगाल (West Bengal) मधील परिस्थिती बघता हा वाद लोकांच्या जीवापेक्षाही अधिक महत्वाचा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. अलीकडेच बंगालमध्ये मुस्लिम तरुणाने ही घोषणा द्यायला नकार दिल्याने एका गटाने त्याला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. हाफिझ मोहम्मद शाहरुख हल्दर (26) असे या तरुणाचे नाव असून तो ट्रेनमधून प्रवास करताना ही घटना घडल्याचे समजत आहे, सुदैवाने ट्रेनमधून फेकलं गेल्यानंतरही हाफिज याला फार इजा झालेली नाही.
या घटनेनंतर हाफीजने स्वतःहून पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्याने केलेल्या विधानुसार हाफीज हुगळीला रेल्वेने जात असताना अचानक एका गटाने “जय श्री राम”च्या घोषणा द्यायला सुरवात केली. त्यांनी त्याला सुद्धा ही घोषणा द्यायला सांगितली. पण त्याने नकार दिला. ज्यावरून या गटाने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. हा एक अक्खा गट असल्याने इतर कोणाचीही मदत करण्याची हिंमत झाली नाही असे देखील हाफीज याने सांगितले. त्यांनतर ट्रेन पार्क सर्कस स्टेशनवर असताना त्यांनी हाफ़ीझला बाहेर ढकलून दिले . त्यावेळी काही स्थानिकांनी मदत करून त्याला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्याला फक्त किरकोळ मार लागला आहे. ... म्हणून मुस्लिम इसमाने बदलला धर्म
दरम्यान रेल्वे पोलीसांच्या माहितीनुसार ही मारामारी ट्रेन मध्ये चढण्या-उतरण्याच्या वादातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आणखी दोन ते तीन जणांना किरकोळ दुखापत झाली असून सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे. मात्र अद्याप कोणलाही अटक करण्यात आलेली नाही. बीफ विकल्याच्या संशयावरून 68 वर्षीय व्यक्तीला जमावाकडून मारहाण; जबरदस्तीने डुकराचे मांस खायला लावले (Video)
हाफीज हा पश्चिम बंगाल मधील दक्षिण 24 परगणामध्ये बसंती येथील रहिवासी आहे . या घाणीची तक्रार करण्यासाठी तो तोपसिया पोलीस स्थानकात गेला असता त्याला रेल्वे पोलिसांकडे पाठवण्यात आले. रेल्वे पोलिसांनी विविध कलमातंर्गत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.