मुंबई, ठाणे सह महाराष्ट्र राज्यातील पालिकांंची आर्थिक स्थिती बिकट
आता त्याचा परिणाम महाराष्ट्रात पालिकेच्या उत्पन्नावरही झाल्याचे दिसून आले आहे. अनेक राज्यातील अनेल महानगरपालिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे.
भारत देशामध्ये आर्थिक मंदीमुळे बांधकाम क्षेत्रापासून जीएसटी पर्यंत अनेक गोष्टींवर त्याचे पडसाद उमटले आहेत. आता त्याचा परिणाम महाराष्ट्रात पालिकेच्या उत्पन्नावरही झाल्याचे दिसून आले आहे. अनेक राज्यातील अनेल महानगरपालिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. IMF कडून भारतीय विकास दरामध्ये घट, अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी मोदी सरकारकडून होणार्या हल्ल्यासाठी सज्ज रहावे: पी चिदंबरम यांचा मोदी सरकार वरही हल्लाबोल.
महाराष्ट्रातील महापालिकांची तुलनात्मक आर्थिक स्थिती पाहता देशाच्या आर्थिक अस्वास्थ्याचा फटका आता राज्यातील बीएमसीला बसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भारताचा आर्थिक विकास दर (India's Growth Forecast) वर्ष 2019-20 यासाठी 4.8% असेल अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताची सध्याची अर्थव्यवस्था पाहता हा दर यंदा कमी करावा लागत असल्याचं आयएमएफ (IMF) कडून सांगण्यात आलं आहे.