मुंबई शेअर बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी मध्ये घसरगुंडी कायम

बाजार उघडताच आज सेन्सेक्स तब्बल 1708.24 अंकांनी कोसळत 33,989.16 अंकांवर आला आहे. सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार पसरला आहे.

Sensex | Photo Credits: File Photo

मुंबई शेअर बाजारात आज (12 मार्च) पुन्हा घसरण पहायला मिळाली आहे. बाजार उघडताच आज सेन्सेक्स तब्बल 1708.24 अंकांनी कोसळत 33,989.16 अंकांवर आला आहे. सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार पसरला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरत असल्याने उद्योग जगताला त्याचा मोठा फटका बसत आहे. सेन्सेक्समध्ये  2424.84 अंकांनी पुन्हा घसरण पहायला मिळाली आहे. दरम्यान ही आजच्या दिवसाच्या पहिल्या भागातील मोठी घसरण आहे.  दोन दिवसांपूर्वी मुंबई शेअर बाजारात 2000 पेक्षा अधिक अंकांनी सेन्सेक्स कोसळला होता. सध्या मुंबई शेअर बाजारात निफ्टी देखील 514 अंकांनी घसरली आहे. दरम्यान आज मुंबई शेअर बाजार उघडताच तो कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी निराशा आहे. मुंबई शेअर बाजार उघडताच सुरूवातीच्या काही मिनिटांमध्ये निफ्टीमध्ये 9916.55 पर्यंत खाली पोहचली होती. काल संध्याकाळी बंद झाल्याच्या तुलनेत हा आकडा 541.85 इतका खाली होता.

मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच जागतिक मार्केटवरही त्याचा परिणाम झाला आहे. आशिया-पॅसिफिक शेअर हे जपान बाहेर 4.1% नुकसानीमध्ये आहेत. हा 2019 च्या पूर्वाधातील निच्चांक आहे. तर जपानच्या Nikkei मध्येही 5.3% घट आहे. साऊथ कोरियामध्ये KOSPI देखील 4.6% घसरले आहे. हा सुमारे मागील साडे चार वर्षातील निच्चांक आहे. मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण, 2342 अंकांनी घसरला सेन्सेक्स; कोरोना व्हायरस, Yes Bank आर्थिक संकंटाचा परिणाम.

ANI Tweet 

निफ्टी  मध्ये घसरण 

दरम्यान काल जागतिक आरोग्य संस्थेने कोरोना व्हायरसला 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून जाहीर करण्यात आले आहे. देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 60च्या वर पोहचली आहे. यामध्येच आज अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 30 दिवसांसाठी युरोपातून येणार्‍या प्रवाशांना बंदी असल्याचं जाहीर केलं आहे.