मुंबई शेअर बाजार मध्ये पडझड कायम; सेन्सेक्स 3000 पेक्षा अधिक अंकांनी कोसळून 29,687.52 पर्यंत गडगडला, निफ्टी मधील ट्रेडिंग पुढील 45 मिनिटं बंद!

दिवसाच्या सुरूवातीला सेन्सेक्स 2400 पेक्षा अधिक तर निफ्टी 700 पेक्षा अधिक अंकांनी कोसळल्याने निराशा आजही कायम राहणार असल्याचं चित्र आहे.

मुंबई शेअर बाजार । Photoo Credits: Twitter

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता भारत देशासह जगभरात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान अमेरिकन बाजार Nasdaq मध्ये 10% घट झाल्यानंतर आज (13 मार्च) दिवशी मुंबई शेअर बाजारमध्येही मोठी पडझड पहायला मिळाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळलेली पहायला आहे. प्री ओपनच्या वेळेस सेंसेक्स 4.85% घट सह 1589.92 अंकांनी पडले असून सेन्सेक्स 31,188.22 वर होता. दिवसाच्या सुरूवातीला सेन्सेक्स 2400 पेक्षा अधिक तर निफ्टी 700 पेक्षा अधिक अंकांनी कोसळल्याने निराशा आजही कायम राहणार असल्याचं चित्र आहे.  आज सकाळी 9.27 वाजता 9.43% घट नोंदवण्यात आली असून सकाली 3090.62 अंकांनी सेन्सेक्स घसरल्याने तो सुमारे 29,687.52 इतका खाली गेला आहे. दरम्यान निफ्टीदेखील कोसळल्याने आता त्यामधील ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी बंद करण्यात आले आहे. तर शेअर मार्केट 1 तासांसाठी बंद करण्यात आलं आहे.   मुंबई शेअर बाजारात आज सर्वात निराशाजनक दिवस; Sensex 2,919 अंकांनी घसरला तर Nifty 9,590 या नीच्चांकावर

 काल संध्याकाळी मुंबई शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 2919.26 अंकांनी घसरून 32,778.14 वर बंद झाला. ही सुमारे 8.18% घसरण होती. तर निफ्टी 868.25 अंकांनी घसरून 9590.15 वर बंद झाला होता. निफ्टीत ही 8.3% घट होती. दरम्यान सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक व्यापार ठप्प आहेत. तर यासोबतच रशिया आणि सौदी अरेबियामध्ये इंधनदरावरून युद्ध सुरू असून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती देखील घसरल्या आहेत. काल मुंबई शेअर बाजरामध्ये सेन्सेक्स सुमारे 3000 पेक्षा अधिक अंकांनी कोसळल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर 9 लाख कोटींचं नुकसान झाल्याची चर्चा झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयामध्ये 16 पैशांची घसरण झाली आहे. तर तो 74.44 वर आला आहे.

भारतामध्ये सध्या कोरोनाचे रूग्ण 70 पेक्षा अधिक आहेत तर कर्नाटकामध्ये एका 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली शहरांमध्ये नागरिकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चीनमधून पसरलेल्या या जीवघेण्या व्हायरसग्रस्तांचं प्रमाण आता हळूहळू घटत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now