Mumbai Rain: मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार, मध्य रेल्वेची वाहतुक विस्खळीत
त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सध्या राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई (Mumbai) , ठाणे (Thane) , रायगड आणि घाट माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) बरसत आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये रविवारी रात्री 40 ते 50 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये 44.6 मिमी पाऊस बरसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिली आहे. रविवारी रात्रीपर्यंत 13.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आजही मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे. (हेही वाचा - Raigad Rains: रायगड जिल्ह्याला आज हवामान खात्याचा 'ऑरेंज अलर्ट'; शाळांना सुट्टी)
हवामान विभागाकडून मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबई अंशतः ढगाळ वातावरण सुरु असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.