Mumbai Airpod Return from Kerala via Goa: मुंबईकर व्यक्तीचे महागडे एअरपॉड केरळमध्ये हरवले, गोव्यात सापडले, 'X' द्वारे काढला माग
इंटरनेटच्या आजच्या महाकाय जंजाळात लोकांचा लोकांशी असलेला संपर्क इतका घट्ट झाला आहे की, असंख्य तोट्यांसोबत त्याचा फायदाही जाणवू लागला आहे. मुंबई (Mumbai) येथे मार्केटींग क्षेत्रात असलेल्या निखील जैन यांना नुकताच याचा अनुभव आला.
इंटरनेटच्या आजच्या महाकाय जंजाळात लोकांचा लोकांशी असलेला संपर्क इतका घट्ट झाला आहे की, असंख्य तोट्यांसोबत त्याचा फायदाही जाणवू लागला आहे. मुंबई (Mumbai) येथे मार्केटींग क्षेत्रात असलेल्या निखील जैन यांना नुकताच याचा अनुभव आला. जैन हे सुट्टी साजरी करण्यासाठी नुकतेच केरळला (Kerala) गेले होते. तेथे त्यांचा अत्यंत महागडा असा एअरपॉड (Airpods) हरवला. ज्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आणि नंतर पोलिसांशी (Goa Police) संपर्क साधला. कदाचित त्यांचा पोलिसांपेक्षाही सोशल मीडियावरील विश्वास अधिक वाढला असावा. पण, त्यांना अनुभूतीही तशीच आली.
सोशल मीडियावरुन एअरपॉडचा शोध
निखील जैन यांनी सोशल मीडियावरुन आपल्या एअरपॉडचा शोध सुरुच ठेवला होता. अखेर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेच. ज्याच्याकडे त्यांचा महागडा एअरपॉड Airpodsहोता. सदर व्यक्ती गोव्यामध्ये होती. तिथे तो ट्रॅक झाला. गोवा पोलिसांच्या मदतीने अखेर दोन महिन्यांनी त्यांनी तो हेडपॉड मिळवला. जैन हे स्टॉन्क्स स्टुडिओ या सोशल मीडिया कंटेंट एजन्सीचे सह-संस्थापक असल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, धक्कादायक! Headphones लावून झोपल्याने कानाची विकेट; तरुणाला बहिरेपण)
सिग्नल नसल्याने अडचण
जैन यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात पीटीआयने म्हटले आहे की, सुट्टी साजरी करण्यासाठी गेले असताना केरळ येथील नॅशनल पार्क येथे त्यांचा एअरपॉड हरवला. बसची वाट पाहात असताना आपली वस्तू हरवील्याचे किंवा कोणीतरी घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या ठिकाणी सिग्नल नसल्याने मला तो ट्रॅक करता आला नाही. त्यामुळे मी तो परिसर सोडला आणि बाहेर एऊन सिग्नल मिळवला. मला सिग्नल भेटला मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण, माझे एअरपॉड घेतलेली व्यक्ती माझ्यापासून जवळपास 40 किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या नॅशनल पार्कमध्ये होती. त्यामुळे मला ते मिळू शकल नाहीत. (हेही वाचा, New Rule For BEST Passengers: आता बेस्टच्या बसमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलण्यास मनाई; व्हिडीओ पाहण्यासाठी हेडफोनचा वापर अनिवार्य)
केरळ पोलिसांना मर्यादा
जैन यांनी पुढे म्हणाले की, त्यांनी नंतर केरळ पोलिसांसह हॉटेलशी संपर्क साधला, परंतु ते फार काही करू शकले नाहीत कारण एअरपॉड असलेल्या व्यक्तीचे लोकेशन निश्चित होत नव्हते. त्यांनी सदर व्यक्ती उतरलेल्या हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला पण हॉटेल व्यवस्थापनानेही म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. उलट ग्राहकाच्या विशेषाधिकाराचा हवाला देत त्यांनी महिती देण्यास नकार दर्शवला. त्यामुळे मी माझ्या उपकरणावरुन त्याता मंगळुरुमार्गे गोवा असा प्रवास ट्रॅक केला. तेव्हा मला जाणवले की, सदर व्यक्ती गोव्यातील असावी. त्यानंतर मी निश्चित लोकेशनसह सदर घटनेबाबत सोशल मीडियावर अवाहन केले.
सोशल मीडियावरुन सुराग
प्राप्त माहितीनुसार जैन यांनी, 21 डिसेंबर 2023 रोजी @niquotein या हँडलवरु स्थान निर्देशांकांसह 'X' वर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले होते की, केरळमध्ये मी माझे नवी एअरपॉड हरवले आहेत. हे एअरपॉड एका व्यक्तीकडे असून ही व्यक्ती *** ठिकाणावरुन प्रवास करते आहे. सध्या ती व्यक्ती 2 दिवसांपासून दक्षिण गोव्यात आहे. त्यामुळे मला असा अंदाज आहे की, सदर व्यक्ती दक्षिण गोवा परिसरात राहणारी आहे. दक्षिण गोव्यातील डॉ. अल्वारो डी लॉयोला फुर्ताडो रोडच्या आजूबाजूला कोणी राहतात का? जेणेकरुन या व्यक्तीपर्यंत पोहोचा येईल.
ट्विटरवरील काही गुप्तहेरांनी सदर गोष्टीची माहिती घेतली आणि पुढच्याकाहीच वेळात वापरकर्त्याने @ItsMeAshwin12 ने गुगल स्ट्रीट मॅपच्या मदतीने घराचे चित्र पोस्ट केले आणि संदेशासह "एअरपॉड्स या घरामध्ये आहेत, असे सांगितले. तुम्हाला हवे असतील तर जाऊन शोध घ्या,असेही ते म्हणाले. दरम्यान, एडवर्ड मस्करेन्हास (@कूलेड) यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी पोस्ट केले: "माझे नातेवाईक तिथेच राहतात आणि मी त्यांना डीटेल्स पाठवले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांचे शेजारी नुकतेच केरळला गेले आहेत. दरम्यान जैन यांनी पीटीआयला सांगितले की, 22 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे उपकरण मरगोवा पोलिस स्टेशनमध्ये होते. नंतर पोलिसांच्या मदतीने मी माझे उपकरण परत मिळवले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)