Mumbai Local Mega Block: मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, जाणून घ्या उद्यासाठीचं रेल्वे वेळापत्रक
उद्या धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य(Central Railway),पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वेच्या (Harbour Railway) वतीनं देण्यात आली आहे.
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य(Central Railway),पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वेच्या (Harbour Railway) वतीनं देण्यात आली आहे. उद्या धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. प्रत्येक रविवारीचं लोकल रेल्वेकडून हा मेगाब्लॉक घेण्यात येतो पण गेल्या दोन दिवसातील मुसळधार पाऊस बघता उद्याचा मेगाब्लॉक मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक ठरु शकतो.
जाणून घ्या कोणकोणत्या मार्गावर कुठल्या वेळात मेगाब्लॉक :-
सेट्रल मार्ग
घाटकोपर (Ghatkopar) येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार (Vidyavihar) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील तर या गाड्या कुर्ला (Kurla), शीव (Sion), माटुंगा (Matunga), दादर (Dadar), परळ (Parel) आणि भायखळा (Byculla) स्थानकांवर थांबणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
CR monsoon update at 09.00 hrs on 2.7.2022. pic.twitter.com/2ihaLpNlHy
— Central Railway (@Central_Railway) July 2, 2022
हार्बर मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल(Panvel),बेलापूरकडे (Belapur) जाणाऱ्या अप हार्बर (Up Harbour) मार्गावरील लोकल रेल्वे धावणार नाहीत. तर पनवेल (Panvel) येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सेवा रद्द राहतील.
ट्रान्सहार्बर मार्ग (Trans Harbour)
ठाणे (Thane) येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद असेल.
पश्चिम रेल्वे मार्ग
पश्चिम रेल्वे अप जलद मार्गावरील मेगाब्लॉक आज रात्री 11.45 ते उद्या पहाटे 3.45 दरम्यान असणार आहे तर डाउन जलद मार्गावर रात्री 12.45 ते 4.45 दरम्यान देखभालीचं कामकाज करण्यात येणार आहे. पण पश्चिम रेल्वे मार्गावरील मध्यरात्रीतील कामकाजामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील नागरिकांनी रविवारी मेगाब्लॉक मधुन दिलासा मिळणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2022 11:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

