Mumbai Film City मुंबईतच राहणार, UP मध्ये नवी फिल्म सिटी उभारणार: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशामध्ये आम्ही नवी फिल्म सिटी उभारणार आहोत. असं म्हणत मुंबईतून बॉलिवूड घेऊन जाण्याच्या चर्चांवर तूर्तास पूर्णविराम लागला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) सध्या मुंबईच्या दौर्यावर आहेत आणि त्यांचा हा दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काल अक्षय कुमार आणि आज बडे उद्योगपती व बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शक यांच्यासोबत चर्चा, गाठी भेटीच्या नंतर मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये बोलताना त्यांनी आपण काही घेऊन जाण्यासाठी मुंबईमध्ये आलोले नाहीत. Mumbai Film City मुंबईतच राहणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये आम्ही नवी फिल्म सिटी उभारणार आहोत. असं म्हणत मुंबईतून बॉलिवूड घेऊन जाण्याच्या चर्चांवर तूर्तास पूर्णविराम लागला आहे. Sanjay Raut On Yogi Adityanath: मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही; संजय राऊत यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला.
उत्तर प्रदेशात कलाकारांच्या, दिग्दर्शकांच्या बदलत्या गरजांनुसार नवी फिल्म सिटी उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी संबंधित तज्ञांसोबत चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशातील नवी फिल्म सिटी ही जेवर एअरपोर्ट पासून 6 किमी अंतरावर आहे. तेथून आगरा 1 तासाच्या अंतरावर आहे. हा प्रोजेक्ट केवळ सरकारचा म्हणून न राहता फिल्म जगतातील मंडळींनीदेखील आपलं योगदान देणं गरजेचे आहे. अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई: 'चित्रपटसृष्टी युपी ला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न' म्हणत मनसे चा CM योगी आदित्यनाथ यांना अप्रत्यक्ष टोला.
ANI Tweet
दरम्यान काल रात्रीपासूनच ट्रायडेंट या सध्या योगी वास्तव्यास असल्यास हॉटेलबाहेर मनसे घाटकोपर विभाग अध्यक्षाने पोस्टरबाजी करत योगींच्या नावाचा थेट उल्लेख टाळत त्यांना 'ठग' संबोधले होते. तर शिवसेनेकडून संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूड उत्तर प्रदेशात पळवण्याच्या प्लॅनचा खरपूस समाचार घेण्यात आला होता.