Mumbai Police कडून RBI कार्यालयात बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचा इमेल पाठवणार्‍या एकाला गुजरातच्या वडोदरा मधून अटक

मात्र कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही. मात्र या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी गुन्हा दाखल केला होता

Arrest pixabay

मुंबई (Mumbai) मध्ये आरबीआय (RBI Office) च्या कार्यालयासह 11 ठिकाणी बॉम्ब हल्ला घडवून आणण्याचा इमेल करणार्‍या एका व्यक्तीला आज (27 डिसेंबर) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. ही अटक गुजरात (Gujrat) मधून करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या (Mumbai Crime Branch) अधिकार्‍यांनी वडोदरा (Vadodara) मधून अटक केली आहे. दरम्यान हा इमेल का पाठवण्यात आला? याची माहिती काढण्याचं काम सध्या सुरू आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

तपासाच्या प्राथमिक टप्प्यावर सध्या आरोपीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. काल आरोपीकडून धमकीचा इमेल पाठवण्यात आला होता त्यामध्ये आरबीआय सह HDFC आणि ICICI मध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. सोबतच 11 विविध ठिकाणं निशाण्यावर असल्याचं म्हटलं होतं. देशात अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गर्व्हनर शक्तीकांत दास यांच्या नावे घोळ सुरू असल्याचा दावा करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. नक्की वाचा: Bomb threat to RBI office in Mumbai: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालय सह 11 ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याच्या धमकीचा इमेल .

धमकीचा मेल येताच मुंबई पोलिसांनी काल 11 ठिकाणी शोध घेतला. मात्र कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही. मात्र या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी गुन्हा दाखल केला होता. आज एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलं आहे. इमेल मध्ये नमूद केलेल्या ठिकाणांमध्ये फोर्टचं आरबीआय ऑफिस, बीकेसी मधील आयसीआयसीआय टॉवर आणि चर्चगेट मधील एफडीएफसी हाऊस यांचा समावेश होता.